Header AD

भिवंडीतील खोणी ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांच्या व वॉलमॅनच्या रखडलेल्या वेतनाच्या निषेधार्थ भीक मांगो आंदोलन..





भिवंडी दि 21 (प्रतिनिधी ) भिवंडी शहरा नजीकच्या खोणी या शहरीकरण होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील तब्बल 36 सफाई कामगारांचा लॉक डाऊन काळातील वेतन ग्रामपंचायत प्रशासनाने न दिल्याने त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पंचायत समिती कार्यालया समोर भीक मांगो आंदोलन केले .



             खोणी ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग कारखाने असून येथे काम करणारे 36 सफाई कामगार व 5 व्हॉल्व्हमेन यांचे वेतन पहिल्या लॉक डाऊन काळात मालमत्ता कराची वसुली न झाल्याने रखडली होती .पुन्हा परिस्थिती रुळावर येत असतानाच दुसऱ्या लॉक डाऊन मुळे पुन्हा वसुली मध्ये खंड पडल्याने ग्रामपंचायत खात्यात निधी नसल्याने वेतन रखडले आहे .



             या विरोधात मनसे महानगरपालिका कामगार सेनेच्या माध्यमातून अर्ज विनंत्या करून ही प्रशासन दाद देत नसल्याने अध्यक्ष संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालय भिवंडी येथे भीक मांगो आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला .त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन व भीक मागून जमा झालेली रक्कम पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना सुपूर्द केली .

भिवंडीतील खोणी ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांच्या व वॉलमॅनच्या रखडलेल्या वेतनाच्या निषेधार्थ भीक मांगो आंदोलन.. भिवंडीतील खोणी ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांच्या व वॉलमॅनच्या रखडलेल्या वेतनाच्या निषेधार्थ भीक मांगो आंदोलन.. Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads