Header AD

युवकाने केले शेकडो लोकांना अन्नदान

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अलीकडल्या काळात वाढदिवसाला केकचा सत्यानाश करण्याची प्रथा अलीकडे खूप वाढू लागली आहे. ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या अंगावर कसलेही द्रव्य ओतून अभिषेक घातला जातो. त्याचबरोबर अंडी फोडून त्याला माखवले जाते. या सगळ्या गोष्टी एकाबाजूला ठेवून पुण्यातील एका तरुणाने स्वतःचा वाढदिवस अन्नाची नासाडी न करता गरिबांना अन्नदान करून साजरा केला आहे.


शुभम शिंदे या तरुणाचा १ जून रोजी २१ वा वाढदिवस होता. त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील शनिवार वाडा आणि आसपासच्या परिसरात कोरोना उपासमारीच्या काळात रस्त्यावर उपाशीपोटी दिसणारे बेघरगोर गरीबदोन वेळच्या अन्नासाठी भटकणारे कष्टकरीलहान मुले या सर्वांना हे अन्नाचे पेकेट्स वाटले.


अन्नाची नासाडी टाळून तेच अन्न गरिबांच्या पोटात गेलं याच मला समाधान आहे. माझ्या मित्रांनी यासाठी मला खूप मदत केली. इतरांनी देखील असं करून निराधारांना आधार द्यावा असे आवाहन  शुभम शिंदे याने यावेळी केले आहे.

युवकाने केले शेकडो लोकांना अन्नदान युवकाने केले शेकडो लोकांना अन्नदान Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads