Header AD

शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप




डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील जिजाई नगर येथे शिवसेना शाखेत उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आणि युवा सेनेचे पदाधिकारी अभिजित थरवळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.



        यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,राजेश कदम,दीपक भोसले, अमोल पाटील,कविता गावंड,संजय मांजरेकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख थरवळ म्हणाले, कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. 



       त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला नाही.गरीब विद्यार्थ्यांना यात मदत मिळावी म्हणून आमच्यावतीने शिवसेनेच्या वर्धापनदिनी मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.यावेळी उपस्थित पालकवर्गानी थरवल यांचे आभार मानत शिवसेना सदैव जनतेच्या पाठीशी उभी असते असे सांगितले.

शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads