Header AD

वट पौर्णिमेला त्या सावित्रीला आपले तोडलेले घर दिले बनवून श्रमजीवी संघटनेच्या सावित्रीनी केले श्रमदान

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण तालुक्यातील चवरे येथे वनविभागाच्या कारवाईत जमीनदोस्त केलेले सावित्री बबन फसाळे या कातकरी विधवा महिलेचे घर श्रमजीवी संघटनेच्या सावित्रीनी वटपौर्णिमेच्या दिवशी भर पावसात बांधून पूर्ण केले.पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून बांधत असलेल्या आदिवासी महिलेच्या घरावर वन विभागाने कारवाई करत हे घर जमीनदोस्त केले होते. वनविभागाच्या या कारवाईनंतर श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा काढत या कारवाईचा निषेध करण्यात आला होता. तसेच संबंधीतांवर कारवाई करत त्या आदिवासी महिलेला घर बांधून देण्याची मागणी करण्यात आली होती. तर प्रशासनाने घर बांधून न दिल्यास श्रमजीवी संघटना घर बांधून देईल असेही सांगण्यात आले होते.मोर्चा मध्ये संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर यांनी ठरवल्या प्रमाणे कल्याण तालुक्यातील श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यां घर बांधणी साठी उभ्या राहिल्या व सावित्रीबाई यांच घर एका दिवसात उभ करून दिले. भर पावसात आपला संसार उघड्या वर आलेल्या सावित्रीच्या डोळ्यात यावेळी आपलं घर परत उभ राहील म्हणून आनंदश्रू होते. संघटनेच्या सभासद यांनी श्रमदानंतून हे घर पूर्ण करून दिले.यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्नेजिल्हा सरचिटणीस दशरथ भालकेतालुका अध्यक्ष विष्णू वाघेतालुका कातकरी घटक प्रमुख वासुदेव वाघेविभागीय सचिव लक्ष्मण वाघेजिजा वाघेधाकळू शेळकेलक्ष्मी वाघे आदी कार्यकर्ते पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

वट पौर्णिमेला त्या सावित्रीला आपले तोडलेले घर दिले बनवून श्रमजीवी संघटनेच्या सावित्रीनी केले श्रमदान वट पौर्णिमेला त्या सावित्रीला आपले तोडलेले घर दिले बनवून श्रमजीवी संघटनेच्या सावित्रीनी केले श्रमदान Reviewed by News1 Marathi on June 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads