Header AD

लॉकडाऊन शिथिल होताच दिव्यात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू


■दिव्यात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करण्याबाबत भाजपा  ठाणे शहर कार्यकारणी सदस्य  रोहिदास मुंडे  यांची  आयुक्तां कडे मागणी...


दिवा ठाणे ,  प्रतिनिधी   ;  दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील लोकसंख्या मागील काही वर्षात भरमसाठ वाढली आहे. विशेषतः दिवा शहरात स्वस्त आणि परवडणारी घर मिळत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनी घर घेतली आहेत. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामं सुरूच असल्याने उपलब्ध सुखसुविधांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि इतर समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड पाणी मिळत असून पाणी मफियांची चांदी झाली आहे.



           लोकडाऊन च्या काळातही इथे काही प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू होती परंतु लॉक डाऊन शिथिल होताच इथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू झाली आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांनी अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे मान्य करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश वजा पत्र प्रशासनाला दिले आहे त्याबद्दल महापौरां चे आम्ही जाहीर आभार मानतो. 



        मात्र सध्या प्रशासनाच्या डोळ्यादेखत अनधिकृत बांधकाम सुरू असल्याने या कामांना दिव्यातील शिवसेनेचे आठ नगरसेवक जबाबदार आहेत दिव्याच्या विद्रुप प्रकरणाला या लोक प्रतिनिधींचा सिंहाचा वाटा आहे तसेच काही लोक प्रतिनिधींनी शासनाने गुरुचरण घोषित केलेल्या जागेमध्ये घरेमांडले आहेत.



         मी प्रशासनाला माननीय आयुक्त उपायुक्त अतिक्रमण ठाणे उपायुक्त परिमंडळ एक सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समिती यांना विनंती करतो की दिव्यातील अनधिकृत बांधकामाचा सर्वेक्षण करून ही सर्व कामे जमीन दोस्त करून त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत बांधकाम व्यवसायिक यांच्यावर गुन्हे दाखल करून दिवेकर यांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपा ठाणे शहर कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे यांच्या वतीने पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

लॉकडाऊन शिथिल होताच दिव्यात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू लॉकडाऊन शिथिल होताच दिव्यात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads