Header AD

टिटवाळ्यात श्रमदानातून साकारणार स्वर्गद्वार

 

■टिटवाळा शिवसेना ग्राहक सरंक्षण कक्ष कल्याण तालुका प्रमुख विजय देशेकर यांची संकल्पना...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  टिटवाळा पूर्व इंदिरानगर परीसरातील स्मशानभूमी ही गेली अनेक वर्ष दयनीय अवस्थेत होती.  नुकतेच या स्मशानभूमीचे नूतनीकरण झाले आहे. स्मशानभूमीच्या आजूबाजूचा ओसाड असलेल्या परीसरात श्रमदानातून सुशोभीकरण करण्यासाठी शिवसेना मांडा-टिटवाळा व टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून रविवारी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या ठीकाणी वृक्षारोपण करण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणपर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मांडा-टिटवाळा परीसरातील सर्व सामाजिक संस्थाराजकीय पक्ष तसेच नागरीकांच्या श्रमदानातून आणि मार्गदर्शनाखाली इंदिरानगर स्मशानभूमी परीसरात वृक्षारोपण व सुशोभीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना कल्याण उपशहरप्रमुख किशोर शुक्लानगरसेवक संतोष तरे,  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कल्याण तालुका प्रमुख,    टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनचे विजय देशेकरसह यांसह  अनेक मान्यवर व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी ३० झाडे लावण्यात आली. याठिकाणी १००१ झाडे लावण्याचा संकल्प असून येणाऱ्या दर रविवारी श्रमदानातून या ठिकाणी महिन्याभरात १००१ झाडे लावण्यात येणार असल्याचे विजय देशेकर यांनी सांगितले. या सामाजिक कार्यात आपण सर्वानी सहभागी होऊन दानशूर नागरिक व उद्योजक यांनी पैसे स्वरूपात कोणतीही मदत न देता श्रमदान, जेसीबी, झाडे, बोअरवेल, विहिर खोदकाम, तलाव सुशोभीकरण, सिमेंट, रेती, विट, ठिबक सिंचन, पत्रे, दरवाजे, खिडक्या आदी वस्तू स्वरूपात सहकार्य करून स्मशानभूमी नव्हे तर स्वर्गाचे द्वार निर्माण करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन विजय देशेकर यांच्या वतीने  मांड-टिटवाळा शहरातील जनतेला करण्यात आले आहे.


टिटवाळ्यात श्रमदानातून साकारणार स्वर्गद्वार टिटवाळ्यात श्रमदानातून साकारणार स्वर्गद्वार Reviewed by News1 Marathi on June 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads