Header AD

भिवंडीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन..

 
भिवंडी दि 26 (प्रतिनिधी) ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आता भाजपकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आले. शनिवार  सकाळी भाजपाच्या वतीने खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रांजणोली नाका येथील मुंबई-नाशिक महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे.          त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे राजकिय नुकसान होणार आहे. तसेच भविष्यात राजकिय आरक्षणा प्रमाणे शैक्षणिक आणि नोकरी मधील आरक्षण देखील रद्द होण्याची शक्यता आहे असंही भाजपने म्हटलं आहे.भाजपाच्या आंदोलन कर्त्यांनी महामार्गावर चक्काजाम करत आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 52 टक्के ओबीसी समाज आहे.त्यानुसार सर्व क्षेत्रात ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे.              आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे
ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही.आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत संघर्ष करणारच. असे ठणकावून सांगत आंदोलन केले यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील,ओबीसी एकता समता परिषदेचे अध्यक्ष प्रा. विनोद हनुमान पाटील,भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष यशवंत सोरे,आदिवासी सेलचे अध्यक्ष महादेव घाटाळ,उद्योग आघाडीचे अध्यक्ष विनोद ठाकरे,प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारी सदस्य बाळाराम कराळे,टी आर पाटील,          रामदास भोईर, सुरेंद्र भोईर, भानुदास पाटील, राम भोईर, राम माळी, तुकाराम चौधरी, गोपीनाथ चौधरी, गिरीश म्हात्रे, विष्णू भोईर,रामनाथ पाटील,छत्रपती पाटील,जितेंद्र डाकी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील,मा.जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर,तालुकाध्यक्ष निलेश गुरव,युवा मोर्चा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष गुरुनाथ जाधव,भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद पाटील,तुकाराम बजागे,रवि जाधव ,योगेश भोईर,विलास भोईर,संदीप चौधरी, पंकज तरे,आदी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान भिवंडी शहरातील कल्याण नाका इथंही चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.■भिवंडी शहरातील कल्याण नाका इथंही भाजपचे चक्काजाम आंदोलन.. 


भिवंडीचे खासदार  कपिल पाटील, आमदार  महेश चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली  भाजपा भिवंडी शहर  जिल्हा अध्यक्ष  संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली व ओबीसी मोर्चा अध्यक्ष महेंद्र अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली  आंदोलन कर्त्यानी  सरकार विरोधात   शहरातील  साकरा देवी मंदिर कल्याण नाका येथे चक्का जाम   करीत  रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात आले.             यावेळी सांगटन महासचिव व नगरसेवक हर्षल पाटील, गटनेता हनुमान चौधरी, महासचिव राजू गाजेंगी, प्रेमनारायण राय,  नगरसेवक श्याम अग्रवाल, नित्यानंद नाडर, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सदस्य निर्मला टावरे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील, सत्वशीला जाधव, युवा अध्यक्ष राजू चौघुले,  महिला मोर्चा अध्यक्ष ममता परमनी, उत्तर भारतीय अध्यक्ष प्रवीण मिश्रा, दक्षिण भारतीय अध्यक्ष मोहन कोंडा, बिहार प्रकोष्ठ अध्यक्ष दीपक झा,  सांस्कृतिक सेल संयोजिका मानसी राजे, सोशल मीडिया प्रमुख राम बुरा,  मंडळ अध्यक्ष भरत भाटी आदी  मोठ्या  संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी   उपस्थित होते.
भिवंडीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन.. भिवंडीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन.. Reviewed by News1 Marathi on June 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads