Header AD

वंचितच्या कॊरोना योद्धांचा सत्कर अनेकांना दिला मदतीचा हात

 नालासोपारा. दि. १२ - वंचित बहुजन आघाडीच्या वसई विरार महानगरपालिकेच्या सचिव रेणुका जाधव व दिलिशा वाघेला यांचा नुकताच कोरूना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. मालाड येथील महानगरपालिकेचे अधिकारी आनंद मालाडकर यांच्या हस्ते हा सत्कार झाला. 


 

              रेणुका जाधव व दिलिशा वाघेला  या वसई-विरार महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. कॊरोना मुळे राज्यात रुग्ण संख्या वाढल्यानंतर  रुग्णांना बेड कमी पडू लागले. अशा रुग्णांची गरज लक्षात घेऊन वाघेला व रेणुका जाधव यांनी रुग्णांना ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड त्याचप्रमाणे आयसीयू उपलब्ध करून दिले.              त्यांच्या खाण्यापिण्याची तसेच चहा पाण्याची सोय करून दिली.  रुग्णवाहिकेची गरज असणाऱ्यांना रात्री-अपरात्री रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्याची दखल घेत मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आनंद मालाडकर यांनी वाघेला व रेणुका जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

वंचितच्या कॊरोना योद्धांचा सत्कर अनेकांना दिला मदतीचा हात वंचितच्या कॊरोना योद्धांचा सत्कर अनेकांना दिला मदतीचा हात Reviewed by News1 Marathi on June 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads