Header AD

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रिपाईच्या आंबेडकर गटाची बैठक

 

■केडीएमसी निवडणुकीत रिपाईचे ५ नगरसेवक निवडून येणार...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गटाची बैठक कल्याणमध्ये नुकतीच पार पडली.रिपाईचे राष्ट्रिय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशाने कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष धर्मा वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी रिपाईच्या कार्यकर्त्यांची बैठक कल्याणमध्ये पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय संघटक सुनिल खांबे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोक ससाणेपँथर नेते तानाजी मिसळे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मंगेश जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक बांधणीपक्षाचे धेय्य धोरण व पक्षापुढील आव्हाने आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीसाठी संपूर्ण कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कमिटी, कल्याण डोंबिवली जिल्हा युवक आघाडी, कल्याण शहर कमिटी, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला आघाडी व कल्याण व डोंबिवली शहर अध्यक्ष, डोंबिवली शहर अध्यक्ष,टिटवाळा शहर अध्यक्ष आदींसह सर्व आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून जिल्हा आयोजित बैठक यशस्वी झाली.       हि बैठक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीची पूर्व तयारी करण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण ठरली. मोठ्या संख्येने युवकांचा पक्ष प्रवेश  येणाऱ्या काळात पक्षाची वाटचाल विजयी असेल असेच बैठकीचे एकूण स्वरूप होते. राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कल्याण डोंबिवली शहर जिल्हा मधील चळवळीशी बांधिलकी जपणारा व फुले शाहु आंबेडकर विचारधारा मानणारा इच्छुक वर्ग पक्षात सामील होऊ पाहत आहे ही पक्षासाठी जमेचीच बाजू असल्याची माहिती कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते यांनी दिली.तसेच पक्षामध्ये काम करत असताना मनभेद जरूर असावे पण मतभेद असू नये हे जर आपण काटेकोर पणे पालन केले आणि पक्ष हित डोळ्यासमोर ठेवून आपण राहतो तेथे जर पक्ष व पक्षाची भूमिका समजावून सांगितली तर पक्ष कल्याण डोंबिवली मध्ये मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करताना येणाऱ्या निवडणुकीत कमीत कमी पाच नगरसेवक निवडून दिले जातील असा विश्वास देखील धर्मा वक्ते यांनी व्यक्त केला. 

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रिपाईच्या आंबेडकर गटाची बैठक पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रिपाईच्या आंबेडकर गटाची बैठक Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads