Header AD

नामवंत शिक्षक गुणेश डोईफोडे यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळकल्याण  , प्रतिनिधी  : कल्याण मधील नामवंत शिक्षक गुणेश डोईफोडे यांचे ह्र्दय विकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


 गुणेश डोईफोडे शिक्षण क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व गुणेश नावाने सर्वांचे परिचित होते. ते कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. परंतु आपल्या कामाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांशी दांडगा संपर्क होता. सतत कामात धडपड आणि व्यस्त क्रीडा क्षेत्रात तर फार झोकून दिलं होतं. लेखनाची आवड असणारे डोईफोडे हे शिक्षण क्षेत्रात काहीतरी नाविन्य आणण्यासाठी सतत प्रयत्नशील होते.


विविध वृत्तपत्रांमध्ये शैक्षणिक लिखाण करून त्यांनी कल्याण-डोंबिवली मध्ये एक आपला वेगळा ठसा उमटवला होता. गुणेश हे नेहमीप्रमाणे आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी वॉकिंगला बाहेर पडले होते. चालत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि आई वडील असा परिवार आहे.

 

प्रतिक्रिया


 1) क्रीडा क्षेत्रातील कोणत्याही स्पर्धेला उपस्थित राहून सर्वांना सहकार्य करणारा. नेहमीच क्रीडा क्षेत्रासाठी धडपड करणारा एक आमचा जवळचा मित्र आणि उत्कृष्ट लेखन करणारा मित्र गमावला आहे.

अविनाश ओंबासे / क्रीडा संघटक

 

2) परवाच त्यांचा फोन आला आणि म्हणाले गुलाबराव कल्याण पूर्व चा इतिहास लिहायचा आहे. तुम्हाला भेटून तुमच्याकडून  माहिती घ्यायची आहे. पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस होता. कल्याण पूर्व बद्दल सर्वांकडून माहिती संग्रहित करून कल्याण पूर्व चा इतिहास हे पुस्तक ते प्रकाशित करणार होते.

 ■गुलाबराव पाटील / महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

 

3) खरंच विश्वास बसत नाही माझ्या छोट्या भावाप्रमाणे नेहमीच मला शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सहकार्य करणारा माझा छोटा भाऊ गेल्याचे मला खूप दुःख असून. हा आघात पचवणे  आम्हाला अवघड झाले आहे कल्याण-डोंबिवली शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मोठी हानी झाली असून एक चांगला लेखक आणि शिक्षक आम्ही गमावला आहे

  ■अंकुर आहेर  / शिवछत्रपती पुरस्कार विजेते

नामवंत शिक्षक गुणेश डोईफोडे यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ नामवंत शिक्षक गुणेश डोईफोडे यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads