Header AD

टीसीएलद्वारे मिनी एलईडी आणि क्यूएलईडी 'सी सीरीज' लॉन्च
"■भारतातील पहिले मिनी एलईडी ४के आणि व्हिडिओ कॉल क्यूएलईडी ४के टीव्ही ~मुंबई, ३० जून २०२१ : टीसीएल एक जागतिक टॉप-टू टेलिव्हिजन ब्रँड आणि आघाडीची कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी असून तिने ब्रँडची नवी २०२१ सी सीरीज श्रेणी लॉन्च केली आहे. यात उत्कृष्ट घरगुती मनोरंजन अनुभवासाठी मॅजिक कॅमेऱ्यासह मिनी एलईडी क्यूएलईडी ४के सी८२५, गेम मास्टरसह क्यूएलईडी ४के सी७२८ आणि व्हिडिओ कॉल कॅमेऱ्यासह क्यूएलईडी ४के सी७२५ यांचा समावेश आहे. नव्या मॉडेलमध्ये १२० हर्ट्झ एमईएमसी, डॉल्बी व्हिजन, डॉल्बी व्हिजन आयक्यू, डॉल्बी व्हिजन अॅटमॉस, आयमॅक्सवर्धित, गेम मास्टर, हँड्स फ्री व्हॉइस कंट्रोल २.०, टीसीएल स्मार्ट यूआय आणि बऱ्याच इतर सुविधांचा समावेश आहे.सी८२५: नवा सी८२५ हा ऑलराउंडर असून तो टीव्ही पाहण्याचा अप्रतिम अनुभव, उत्कृष्ट गेमिंग किंवा मित्र, सहकारी आणि कुटुंबासोबत अखंडपणे संवाद साधण्याची सुविधा पुरवतो. सी८२५ द्वारे टीसीएल मिनी एलईडीच्या क्षेत्रात एक नवे परिवर्तन घडवून आणत असून, टीव्हीमध्ये स्ट्रेट डाउन बॅकलाइट मोड आहे. याद्वारे पारंपरिक एलईडीमधील ग्रेनसाइज लक्षणीयरित्या कमी केली जाते. यात एचडीएमआय २.१ सह गेम मास्टर हे अत्याधुनिक गेमिंग फीचरदेखील आहे. यात डॉल्बी अॅटमॉससह आयमॅक्सवर्धित सर्टिफाइड २.१ इंटिग्रेटेड ऑनक्यो साउंडबार असून त्यात बिल्ट-इन सबवूफर आहेत. डॉल्बी अॅटमॉसद्वारे, श्रोत्यांना समृद्ध आणि अप्रतिम ध्वनीच्या लाटेचा अनुभव मिळतो. हे टीव्ही ५५ आमि ६५ इंचप्रकारात उपलब्ध असून ते अनुक्रमे ११४,९९० रुपये आणि १४९,९९० रुपयांत उपलब्ध आहेत.सी७२५: सी७२५ द्वारे घरगुती मनोरंजन देणाऱ्या डिव्हाइसचा अनुभव देण्याकरिता आकर्षक फीचर्स आहेत. व्हिडिओ कॉल कॅमेऱ्याद्वारे यूझर्स क्यूएलईडी डिस्प्लेवर गूगल ड्युओद्वारे व्हिडिओ कॉलिंगचा आनंद तुम्हाला घेता येतो. पिक्चरसाठी तो डॉल्बी व्हिजन, एचडीआर १०+ टेक्नोलॉजी, ४के रिझोल्युशन, एआयपिक्यू इंजिन असून तो अप्रतिम पिक्चरसाठी एमईएमसी आणि एचडीएमआय 2.1 ला सपोर्ट करतो. टीव्हीत डॉल्बी ऍटमॉससह ऑनक्यो प्रमाणित साउंडबार आहेत.स्मार्ट फीचरच्या बाबतीत, सी७२५ हा टीव्ही टीसीएल स्मार्ट यूआयसह ऑपरेट होतो. यात टीसीएल होम एंटरटेनमेंट सेंटरचा समावेश आहे. यात टीसीएल चॅनेल ३.० मध्ये यूझर्सना सर्व प्रकारच्या ग्लोबल आणि लोकल कंटेंटचा आनंद लुटता येतो. हा टीव्ही ५०, ५५ आणि ६५ इंच प्रकारात असून तो अनुक्रमे ६४,९९० रुपये, ७२,९९० रुपये आणि ९९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
सी७२८: भव्य स्क्रीनवर उत्कृष्ट गेमिंगसाठी तयार केलेला सी७२८ हा टीव्ही सर्व गेमर्ससाठी टीसीएलची प्रीमियम ऑफरिंग आहे. यात एचडीएमआय २.१ समर्थित गेम मास्टर आहेत. तसेच व्हेरिएबल रिफ्रेश रेट, ऑटो लो लॅटन्सी मोड, ईएआरसी आणि कंपनीच्या मालकीचे सॉफ्टवेअर अल्गोरिदम यासारखे तंत्रज्ञान आधारीत घटक आहेत. याद्वारे गेमर्सना उत्कृष्ट गेमिंग अनुभव मिळेल. 
यात क्यूएलईडी डिस्प्ले टेक्नोलॉजी असून याद्वारे १०० % कलर व्हॉल्यूम मिळतो आणि पाहण्याचा अधिक चांगला अनुभव मिळतो. या उपकरणात १२० हर्ट्झ एमईएमसीची सुविधा आणि यूझरच्या नियंत्रणासाठी टीव्हीला सोप्या आणि थेट व्हॉइस कमांड्सद्वारे हँड्स फ्री व्हॉइस कंट्रोलची सुविधा मिळते. हा टीव्ही ५५, ६५ आणि ७५ इंच प्रकारात उपलब्ध असून तो अनुक्रमे ७९,९९० रुपये; १०२,९९० रुपये आणि १५९,९९० रुपयांत उपलब्ध आहे.

टीसीएलद्वारे मिनी एलईडी आणि क्यूएलईडी 'सी सीरीज' लॉन्च टीसीएलद्वारे मिनी एलईडी आणि क्यूएलईडी 'सी सीरीज' लॉन्च Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads