Header AD

डॉटपेची ललित हॉटेल सोबत भागीदारी
■हॉस्पिटॅलिटी ब्रँडला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ...मुंबई, २८ जून २०२१ : कोव्हिड-१९ ने अनेक उद्योगांना नुकसान पोहोचवले आहे आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला तर मोठा हादरा दिला आहे. अशा प्रकारच्या संकटकाळात, गुरुग्राम येथील डॉटपे या ओ२ओ कॉमर्स ब्रँडने उद्योगांना नुकसानीतून उभे राहण्यासाठी मदत केली. तसेच तंत्रज्ञान आधारीत नावीन्यपूर्ण सोल्युशन्सद्वारे त्यांना अखंडपणे कार्य करत राहण्याची हमी दिली. या उपक्रमाचा भाग म्हणून कंपनीने रेस्टॉरंट कामकाजात वृद्धीकरिता द ललित हॉटेलसोबत भागीदारी केली.डॉटपेच्या अखंड आणि संपर्करहित ऑर्डरींग सोल्युशन्सद्वारे द ललित हॉटेलला त्यांच्या मौल्यवान ग्राहकांपर्यंत पौष्टिक खाद्यपदार्थ पुरवणे या धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून शक्य होईल. त्यामुळे ग्राहकांसोबत निरोगी आणि अखंड नाते कायम राखण्यास मदत होईल. जे पाहुणे रेस्टॉरंटपर्यंत येऊ शकत नव्हते, ते आता ऑनलाइन ऑर्डर करू शकतात आणि त्यांच्या घरापर्यंत अन्नपदार्थ मागवू शकतात. डॉटपेच्या लास्ट माइल डिलिव्हरीद्वारे या हॉस्पिटॅलिटी ब्रँडला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांपर्यंत पोहोचतचा येईल व पूर्वीपेक्षा त्यांच्या गरजा अखंडपणे पुरवता येतील.डॉटपेचे संस्थापक आणि सीओओ, अनुराग गुप्ता म्हणाले, "आम्ही तंत्रज्ञान-सशक्त उद्योग असून नूतनाविष्कारावर आमचा दृढ विश्वास आहे. ऑफलाइन बिझनेसचा चेहरा बदलण्यात याचा खूप मोठा वाटा आहे. अगदी सुरुवातीपासूनच, आम्ही डिजिटल क्षमता विकसित करण्यासाठी आणि त्या पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेणेकरून उद्योगांच्या कामात परिवर्तन घडवता येईल आणि त्यांचे ऑनलाइन अस्तित्वही वाढवता येईल. द ललित हॉटेल या आघाडीच्या हॉस्पिटॅलिटी कंपनीसोबत भागीदारी करताना आणि त्यांच्या वृद्धीच्या प्रवासात त्यांना अधिक सक्षम करताना आम्हाला आनंद होत आहे. आपच्या अद्वितीय प्लॅटफॉर्मद्वारे त्यांचे कामकाज अधिक अखंडपणे करता येईल आणि त्यांच्या ग्राहकांना अत्युच्च समाधान देणारा डिलिव्हरी अनुभव मिळेल."

डॉटपेची ललित हॉटेल सोबत भागीदारी डॉटपेची ललित हॉटेल सोबत भागीदारी Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads