Header AD

फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने सोसायटी मध्‍ये राबवली पहिली सामुदायिक लसीकरण मोहिम सुमारे १३०० लाभार्थींचे लसीकरण

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल नवी मुंबईच्‍या लसीकरण उपक्रमामध्‍ये मदतीचा हात पुढे करण्‍यास अग्रस्‍थानी राहण्‍यासोबत अधिकाधिक लोकांना त्‍यांच्‍या घरांपर्यंत लसीकरण सुविधा मिळण्‍याच्‍या कार्यक्रमामध्‍ये सक्रियपणे सहभागी राहिले आहे. सानपाडा येथील मोराज सोसायटी १८ वर्षांवरील लोकांसाठी सामुदायिक लसीकरण उपक्रमांतर्गत लसीकरण मोहिम राबवण्‍यात आलेली पहिली गृहनिर्माण सोसायटी ठरली. 


३१ मे व १ जून २०२१ रोजी वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमधील डॉक्‍टर्स व परिचारिकांनी या गृहनिर्माण सोसायटीमधील जवळपास १३०० निवासींचे लसीकरण केले. हा सामुदायिक लसीकरण उपक्रम अधिकाधिक लोकांना लस देण्‍यासाठी अधिकाधिक गृहनिर्माण संकुलांपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे. हॉस्पिटलने समुदायामध्‍ये लसीकरणाच्‍या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी आणि त्‍यांना कोविड-१९ विरोधात आवश्‍यक असलेली लस घेण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन ठेवला आहे.
महानगरपालिकेने जारी केलेल्‍या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत लसीकरण करण्‍याच्‍या खात्रीसाठी हॉस्पिटलसह मोराज सोसायटीने व्यवस्था केली आहेजेणेकरुन लोकांना गर्दी न करता लस घेण्‍यास मदत होईल. या उपक्रमामुळे लोकांमधील लस घेण्‍यासाठी हॉस्पिटलला येण्‍याची भिती देखील दूर होते.


कोविड-१९ महामारीवर मात करण्‍याचा महत्त्वपूर्ण उपाय म्‍हणजे लवकरात लवकर अधिकाधिक लोकांचे लसीकरण करणे. या उपक्रमासह आम्‍हाला लसीकरण केंद्रांवर गर्दी न करता अधिकाधिक लोकांचे लसीकरण करण्‍यामध्‍ये मदत होण्‍याची आशा आहे. स्‍थानिक महानगरपालिकेसोबत सहयोगाने आम्‍ही सामुदायिक लसीकरण मोहिमेसाठी खास एसओपी तयार केल्‍या असल्याची माहिती फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे फॅसिलिटी डायरेक्‍टर संदीप गुदुरू यांनी दिली.


गृहनिर्माण सोसायटीमध्‍ये सामुदायिक लसीकरण मोहिम राबवण्‍यासाठी सुभेंदू भट्टाचार्जी यांना ७७३८८८९९०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने सोसायटी मध्‍ये राबवली पहिली सामुदायिक लसीकरण मोहिम सुमारे १३०० लाभार्थींचे लसीकरण फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलने सोसायटी मध्‍ये राबवली पहिली सामुदायिक लसीकरण मोहिम सुमारे १३०० लाभार्थींचे लसीकरण Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads