Header AD

भाजपा, कोकण विकास आघाडी तर्फे कळकवणे येथे तौक्ते वादळग्रस्तांना ताडपत्री व धान्य वाटप
चिपळूण (प्रतिनिधी) : भाजपा, कोंकण विकास आघाडीच्या वतीने, सबका साथ..! सबका विकास..! या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून व माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या निश्चयातून नुकतेच चिपळूण तालक्यातील  दसपटीतील कळकवणे येथे तोक्ते  वादळग्रस्तांना  ताडपत्री व धान्य मदत करण्यात आले. या उपक्रमाचे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व पक्षीय गावातील मान्यवर देखील उपस्थित होते.           हा कार्यक्रम कोंकण विकास आघाडीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री राजाराम मोरे यांच्या प्रयत्नातून व चिपळूण तालुका संपर्क प्रमुख यांच्या नियोजन व रुपरेषेतून यशस्वी झाला. यासाठी कोकण विकास आघाडी, मुंबईचे कार्याध्यक्ष अध्यक्ष सुहास आडिवरेकर याचे मार्गदर्शन व मोठे योगदान लाभले. यामुळेच  मुंबई भाजपाच्या अनेक पदाधिकारी, आमदार, खाजदार यांच्यावतीने विपुल मदत लाभली.            या कार्यक्रमाला उत्तर रत्नागिरी जिल्हा सचिव  रामदास राणे, चिपळूण नगरसेवक परिमल भोसले, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रणय वाडकर, चिपळूण युवा अध्यक्ष अभिजीत शिंदे, ओवळी व कळकवणे गावच्या सरपंच, त्याचप्रमाणे कोंकण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मोरे, चिपळूण तालुका संपर्क प्रमुख संतोषराव शिंदे उपस्थित होते. उपरोक्त कार्यक्रमाच्या नियोजनामुळे गरीब व नुकसानग्रस्तांमध्ये हर्ष व उल्हासाचे भाव पहावयास मिळाले असून त्यानी सर्व मदतगारांचे आभार मानले आहेत.

भाजपा, कोकण विकास आघाडी तर्फे कळकवणे येथे तौक्ते वादळग्रस्तांना ताडपत्री व धान्य वाटप भाजपा, कोकण विकास आघाडी तर्फे कळकवणे येथे तौक्ते वादळग्रस्तांना ताडपत्री व धान्य वाटप Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला मनसेचा ठाम विरोध

  डोंबिवली ( शंकर जाधव ) ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याच्या सरकारच्या नियमाला मनसेने ठाम विरोध केला आहे.करोनाची  तिसरी लाट येणार नाही हे स...

Post AD

home ads