Header AD

कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने मानवी साखळी

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : नवी मुंबई येथील निर्माणाधिन विमानतळास स्थानिक भूमिपुत्र दी . बा . पाटील यांचे नांव देण्यात यावे या मागणी साठी चार जिल्ह्यांमध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या जनसंपर्क कार्यालया समोरील पूना लिंक रोड वर पक्ष पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या सहभागाने मानवी साखळी  करण्यात आली होती.




        दि. बा. पाटील यांचे पक्षभेद विरहीत खुप मोठे योगदान आहेते नवी मुंबई परिसरातील भुमी पुत्रांच्या पाठीशी सदैव समर्थ पणे उभे राहिले आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव होण्यासाठी नवी मुंबई येथील नियोजित विमानतळाला त्यांचेच नांव दिले गेले पाहिजे. आपले संपुर्ण आयुष्य दि. बा. पाटील यांनी स्थानिक भूमिपुत्रांसाठी खर्च केले आहे. यासाठी पक्षपातळी वरून नवी मुंबईतील विमान तळाला त्यांचे नांव देणे योग्य आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास पक्ष पातळीवरून तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी दिला.




       या मानवी साखळीत कल्याण जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यु गायकवाड यांच्यासह नरेंद्र सुर्यवंशी, संजय मोरे, संदिप तांबेसुभाष म्हस्केअरुण दिघेवंदना मोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने मानवी साखळी कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने मानवी साखळी Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads