Header AD

दिव्यांगासाठी केडीएमसीने राबिवला लसीकरणाचा विशेष उपक्रम

 

■पालिकेच्या कल्याण व डोंबिवलीतील दोन्ही नाट्यगृहात १२८ दिव्यांगानी घेतला लसीकरणाचा लाभ...


कल्याण , कुणाल म्हात्रे   : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने दिव्यांगासाठी पालिकेच्या कल्याणातील आचार्य अत्रे व डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. या लसीकरणाच्या मोहिमेत पालिका क्षेत्रातील सुमारे १२८ दिव्यांगाना कोव्हिडं लसीकरणाचा लाभ मिळाल्याने दिव्यांगाच्या चेहर्यावर आनंद पसरला होता .           कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत केंद्र सरकार कडून लसींचा पुरवठा होत असल्याने शहरातील सर्वच लसीकरण केंद्रात नागरिकांची गर्दी उसळत असल्यामुळे दिव्यगांना लसीकरणासाठी खूप अडचणी येत होत्या. दिव्याग्यां मधील काही असे नागरिक आहेत की त्यांना चालणे सुद्धा कठीण होत आहे. तासंतास  लसीकरणासाठी रांगेत उभे राहू शकत नसल्याने अनेक संघटनेने पालिकेकडे या बाबत पत्र देण्यात आले होते.हि मागणी लक्षात घेता पालिका प्रशासनाने दिव्यांगां साठी लसीकरणासाठी सोमवारी सकाळी कल्याणातील दिव्यांगासाठी आचार्य अत्रे नाट्यगृह येथे तर डोंबिवलीतील दिव्यांगासाठी सावित्रीबाई बाई फुले नाट्यगृहात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केल्याने या लसीकरणाचा दिव्यांगानी लाभ घेतला कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहातील लसीकरण केंद्रातून ७२ तर डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्य गृहातील लसीकरण केंद्रातून ५६ अश्या १२८ दिव्यांगांनी लसीकरणाचा लाभ घेतला. तसेच१८ वर्षे आणि त्यापुढील दिव्यांग नागरिकांचे याठिकाणी लसीकरण केले जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

दिव्यांगासाठी केडीएमसीने राबिवला लसीकरणाचा विशेष उपक्रम दिव्यांगासाठी केडीएमसीने राबिवला लसीकरणाचा विशेष उपक्रम Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads