Header AD

ड्रूमने २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ८०% वृद्धी नोंदवली

 मुंबई, १५ जून २०२१: ऑटोमोबाइल सेग्मेंटमध्ये कॉन्टॅक्टलेस खरेदीच्या मोठ्या मागणीमुळे भारताच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन ऑटोमोबाइल मार्केटप्लेस, ड्रूमने २०२१ वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ८०% वृद्धी नोंदवली आहे. ड्रूमने पहिल्यांदाच मासिक जीएमव्हीमध्ये १००० कोटी रु. चा आकडा मार्च’२१ मध्ये पार केला.महामारीच्या प्रादुर्भावानंतर, ड्रूमसाठी ही तिमाही सर्वात चांगली ठरली. ड्रूमच्या या वृद्धीसाठी अनेक कारक जबाबदार आहेत, ज्यामध्ये ऑटोमोबाइलच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीत तेजी, गेल्या तिमाहीतील लॉकडाउननंतर सप्लाय चेन उघडल्यामुळे उत्तम पुरवठा, इन्व्हेंटरीच्या कमी किंमती आणि सुरक्षा कारणांमुळे राइड शेअरिंग किंवा सार्वजनिक वाहतुकीच्या ऐवजी उपभोक्त्याने आपल्या मालकीचे वाहन असण्यावर भर देणे वगैरेचा समावेश आहे.ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ संदीप अग्रवाल म्हणाले, “हे सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, ड्रूमने २०२१च्या पहिल्या तिमाहीत मागच्या वर्षाच्या तुलनेत ८०% वाढ नोंदवली आहे. कोव्हिडमुळे या क्षेत्रात माजलेल्या खळबळीनंतर ड्रूमच्या वृद्धीचा आलेख सतत उंचावणारा आहे. ऑटोमोबाइल हा सर्वात मोठा रिटेल वर्ग आहे पण त्याचा ऑनलाइन विस्तार खूप कमी आहे. कोव्हिड आल्यानंतरच्या काळात ऑटोमोबाइल खरेदी आणि विक्री खूप जास्त वेगाने ऑनलाइनकडे वळत आहे. मानवी जीवनातील जवळजवळ सगळे मोठे आणि महत्त्वाचे निर्णय किंवा व्यवहार, उदा. जीवनसाथीचा शोध, विद्यापीठात प्रवेश किंवा घर खरीदणे, नोकरी बदलणे वगैरे सर्वच ऑनलाइन होऊ लागले आहे आणि ऑटोमोबाइलची खरेदी-विक्री देखील आता याला अपवाद राहिलेली नाही.ते पुढे म्हणाले, “आम्ही केवळ जगातील पहिले विशुद्ध प्ले ऑनलाइन मार्केटप्लेस उभारण्यासाठी गेली सात वर्षे आणि कोट्यवधी डॉलर्स खर्च केलेले नाहीत, तर ऑटोमोबाइल खरेदी-विक्रीचे ऑनलाइन शिफ्ट शक्य व्हावे यासाठी फर्स्ट माइल, मिड माइल आणि लास्ट माइल सेवांची संपूर्ण इकोसिस्टम आम्ही विकसित केली आहे. महामारीची ही दुसरी लाट विरल्यानंतर आम्ही दक्षिण-पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेत आमचा विस्तार चालू ठेवण्यासाठी योजना करत आहोत."

ड्रूमने २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ८०% वृद्धी नोंदवली ड्रूमने २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ८०% वृद्धी नोंदवली Reviewed by News1 Marathi on June 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads