Header AD

२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव






डोंबिवली ( शंकर जाधव) इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आलेली जोरदार मागणी आणि मराठी माध्यमाच्या शाळांना आलेली दुरावस्था असली तरी  काही मराठी शाळा, ठामपणे पाय रोवून उभ्या आहेत. मातृभाषा मराठीतून ज्ञानदान करण्याचं त्यांचं कार्य आजही चालू आहे. अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने हे शिक्षक व मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहेत.रोटरी क्लब- डोंबिवली रिजन्सीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम केला. 



         वीस वर्षांहून अधिक काळ मराठी माध्यमातून शिकवण्याचं व्रत आचरणाऱ्या  डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद गणेश पथ, गोपाळनगर, दत्तनगर, स.वा.जोशी विद्यालय, टिळकनगर विद्या मंदिर, मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालय, शांतीनगर विद्यालय सात शाळांमधील  २० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या एकूण ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव या रोटरी क्लबने केला.



            पुढील टप्प्यात कडोंमपा शाळा व इतर मराठी शाळां मधील शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे, असे उपक्रम अध्यक्ष  अमित श्रीकृष्ण देशपांडे यांनी सांगितले.राेटरी क्लब डाेंबिवली, रिजन्सिच्या अध्यक्षा लक्ष्मी शर्मा, उपक्रम अध्यक्ष  अमित श्रीकृष्ण देशपांडे, व सभासद रेणू अग्रवाल, सुमीत जगताप यांनी हा उपक्रम यशस्वी केला.
२० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव २० ते ३७ वर्ष सेवा केलेल्या ६३ शिक्षकांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन  गौरव Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads