Header AD

शिक्षकांना बीएलओच्या कामाला जुंपले दहावीच्या शिक्षकांना बीएलओच्या कामातून वगळा

 


■कल्याण मध्ये दहावी निकालाचे कामकरणाऱ्या भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांची मागणी....कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  एकीकडे दहावीच्या निकालाची शाळेत कामे सुरू असून दुसरीकडे शिक्षकांना बीएलओच्या कामाला जुंपण्यात आले असून शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे.कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील शाळांमधील अनेक शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) च्या कामाचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये शिक्षकांना मतदार यादीचा अभ्यास करणेयादीतील दुरुस्ती करणे,  दुबारमयतस्थलांतरीत व मतदान छायाचित्र चिटकविणेमतदारांना आपल्या ताब्यातील नोटिसा बजावणे इत्यादी कामे करावी लागणार आहेत.यंदा दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे अंतर्गत गुणांवर आधारित निकालाची कामे शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविली आहेत. दिलेल्या मुदतीत ही सर्व कामे करायची असल्याने सर्व शाळांमध्ये शिक्षकांची निकालाची धावपळ सुरू आहे त्यातच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्यामुळे निकालाची कामे करायची की बीएलओची असा संतप्त सवालही अनिल बोरनारे यांनी प्रशासनाला विचारला असून तातडीने अशैक्षणिक कामे बंद करण्याची मागणी केली आहे.


शिक्षकांना बीएलओच्या कामाला जुंपले दहावीच्या शिक्षकांना बीएलओच्या कामातून वगळा शिक्षकांना बीएलओच्या कामाला जुंपले दहावीच्या शिक्षकांना बीएलओच्या कामातून वगळा Reviewed by News1 Marathi on June 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads