Header AD

योग दिनाला कल्याण वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नरेंद्र पवार आयोजित २७ प्रभागां मध्ये योग दिनाचे आयोजन

 

■प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या जीवनात करावा- खासदार कपिल पाटील...



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या जीवनात करावा असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार नरेंद्र पवार आयोजित कल्याण शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे व मोहन टिटवाळा अध्यक्ष शक्तीवान भोईर यांच्या सहकार्याने २७ प्रभागांमध्ये योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले.



या कार्यक्रमात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कोरोना काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतोशिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने योगा करण्याचे आवाहन पवार यांनी केले. सकाळी ७ वाजता प्रभाग २१ मध्ये खासदार कपिल पाटील व माजी आमदार नरेंद्र पवारकल्याण शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर संपन्न झाले.



 यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते दिनेश तावडेभाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्माभाजपा शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारेओबीसी प्रदेश सचिव अनिल पंडित, नगरसेवक दया गायकवाड, उपस्थित होते. यासह इतर अनेक ठिकाणी खासदार कपिल पाटील व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी विविध योग शिबिरांना भेट देऊन उपस्थितांना योगाचे महत्व पटवून दिले.

योग दिनाला कल्याण वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नरेंद्र पवार आयोजित २७ प्रभागां मध्ये योग दिनाचे आयोजन योग दिनाला कल्याण वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नरेंद्र पवार आयोजित २७ प्रभागां मध्ये योग दिनाचे आयोजन Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads