Header AD

मुंब्रा-कौसा भागात मोठ्या प्रमाणात नागरी कामे रखडली ठेकदार ठामपाचे जावई आहेत का ?- शानू पठाण
ठाणे (प्रतिनिधी) - मुंब्रा-कौसा भागात ठेकेदारांकडून सुरु असलेली कामे रखडली आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात सिंडीकेट आहे. त्यामुळेच ही कामे रखडली आहेत. त्यामुळे आपण संबधितांना 15 दिवसांचा अल्टीमेटम देत आहोत. जर, 15 दिवसात रखडलेली कामे पूर्ण केली नाही. तर, अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करण्यासाठी आपण राज्य शासनाकडे जाऊ, असा इशारा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिला.              शानू पठाण यांनी मंगळवारी मुंब्रा-कौसा, कळवा भागात सुरु असलेल्या नागरी कामांची पाहणी केली. यावेळी त्यांना ठेकेदारांनी अनेक कामे अर्धवट अवस्थेत सोडली असल्याचे निदर्शनास आले. जलवाहिन्या, युटीडब्ल्यूटी, भूमिगत केबल, मल:निस्सारण आदी कामे रखडली असल्याचे पठाण यांच्या निदर्शनास आले.             पठाण यांनी यासंदर्भात सांगितले की, रखडलेल्या कामांच्या बाबतीत नगरसेवकांकडून अनेकदा तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये असलेल्या साटेलोट्यांमुळे ही कामे रखडली आहेत. अशा स्थितीमध्येही अधिकार्‍यांकडून ठेकेदारांना बिले अदा केली जात आहेत. या सर्व प्रकाराला कार्यकारी अभियंंतेच जबाबदार आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या दुकानदारांना रस्त्यावर आणले आहे.             मात्र, त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. कामे अर्धवट सोडून लोकांच्या शिव्याशाप घेतले जात आहेत. याची साधी लाजही या लोकांना वाटत नाही का? असा सवाल करुन जर 15 दिवसात ही कामे पूर्णत्वास नेली नाहीत तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्या चौकशीसाठी आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करु, असा इशाराही त्यांनी दिला. ■चार ठेकेदारांना काळ्या यादीत टाका


सध्या युटीडब्ल्यूटीचे काम सह्याद्री, मल:निस्सारणाचे काम के. ई इन्फ्रा; वॉटर रिमॉल्डींगचे काम शयानो; अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम सागार साई या ठेकेदारांकडून सुरु आहे. मात्र, नेहमीप्रमाणे या ठेकेदारांनी कामे अर्धवट ठेवली आहेत. या संदर्भात विचारणा केल्यास ते अश्लाघ्य भाषेत बोलत आहेत. अगदी महिला नगरसेवकांशी बोलताना कोणत्याही प्रकारची नित्तीमत्ता ते बाळगत नाहीत. त्यामुळे या ठेकेदारांची देयके रोखून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही शानू पठाण यांनी केली आहे.*

मुंब्रा-कौसा भागात मोठ्या प्रमाणात नागरी कामे रखडली ठेकदार ठामपाचे जावई आहेत का ?- शानू पठाण मुंब्रा-कौसा भागात मोठ्या प्रमाणात नागरी कामे रखडली ठेकदार ठामपाचे जावई आहेत का ?- शानू पठाण Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads