Header AD

५०अंध व्यक्तींना लसीकरणा सह रेशन किटची मदत डोंबिवली शिवसेना शाखेचा पुढाकार




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : रोटरी क्लब ऑफ सनसिटी आणि शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने ५०  अंध व्यक्तींना लसीकरण करून रेशनिंग किट देण्यात आले.

    


            डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर शिवमंदिर येथील ज्ञानेश्वर हिंदी हायस्कुलच्या लसीकरण केंद्रात वांगणी, कर्जतकल्याण, बदलापूर  व डोंबिवली येथील अंध व अपंग ५० ते ६० व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. रोटरी क्लब सनसिटी डोंबिवली आणि डोंबिवली शहर शाखे मार्फत अंध - अपंगांना विशेष लसीकरण शिबिर ठेवण्यात आले होते.  राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तीला लस मिळायलाच हवी ह्याच उद्देशाने ही लसीकरण मोहीम घेण्यात आली.



          शिवसेना नेहमी समाजकार्य करते असतेत्याचाच  एक भाग म्हणून अंध-अपंगांसाठी कोणतीही रांगा व गर्दी न करता त्यांच्यासाठी एका खोलीत विशेष व्यवस्था करून त्यांचे लसीकरण करून घेतल्याचे शहरप्रमुख मोरे यांनी सांगितले. यावेळी मोरे यांच्यासह महापालिका वैधकीय अधिकारी डॉ अदवरयु गौडकर, उपअभियंता रोहिणी लोकरे, रोटरीचे निशांत व्यास, लक्ष्मी शर्माविभाग प्रमुख किरण पाटील, अनिल माळी, सागर जेधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

५०अंध व्यक्तींना लसीकरणा सह रेशन किटची मदत डोंबिवली शिवसेना शाखेचा पुढाकार ५०अंध व्यक्तींना लसीकरणा सह रेशन किटची मदत डोंबिवली शिवसेना शाखेचा पुढाकार Reviewed by News1 Marathi on June 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads