Header AD

भिवंडी पोलिसांनी आवळल्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त

 

 
भिवंडी(प्रतिनिधी) भिवंडी शहरात अनलॉक काळापासून चोरटयांनी धुमाकूळ घातल लाखोंचे महागडे मोबाईलसह रेडिमेड कपड्याची चोरी करणाऱ्या अट्टल  त्रिकुट चोरट्यांच्या  मुसक्या आवळ्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आलेअमन सुलतान मोमीन (वय १९ रासमजदनगरभिवंडीजैद अब्दुल खालीक अन्सारी ( वय २३ रा.  इस्लामपुराभिवंडीआणि  मायकल ( वय १९)  असे अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे असून त्यांच्याकडून आतापर्यत  एकूण   लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे


 

चोरटे नागरिकांचे मोबाईल हिसकावून काढायचे पळ ..       जगदीश हिराजी देसले (वय ३२)  हे कामानिमित्ताने १७ मार्च २०२१रोजी  भिवंडीतील अरिहंत सिटी  येथे ताडाली जकात नाका मार्गे पाईपलाईन रोडने जात होतेत्यावेळी दुचाकीवरून आलेल्या  चोरटयांनी त्यांना लाकडी  दांडक्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून १० हजार ६०० रुपयांचा मोबाईल हिसकवून पळ काढलात्यांनतर त्यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात त्या  चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असता  सदर गुन्हा दाखल होताच  पोलीस आयुक्तयोगेश चव्हाणसहा पोलीस आयुक्तकिसन गावीत आणि  वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे)  अजय कांबळे यांनी पोलीस तपास पथकासह  या चोरट्यांचा शोध सुरु असता गुप्त बातमीदाराच्या मदतीने मोबाईल चोरीच्या गुन्हयातील आरोपी अमन  त्याचा एक साथीदार असल्याची माहिती मिळालीत्यानुसार त्यांचा  शोध घेऊन आरोपी अमनला भिवंडीतून अटक केली


 

आरोपीकडून   लाख ७० हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत..

 

पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या  आरोपी  अमनची अधिक चौकशी केली असता  त्याने साथीदारासह  मोबाईल हिसकावून पळ काढल्याची कबुली दिलीत्यांनतर त्याला पोलीस कोठडी सुनावली असता पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आतापर्यत   एकुण ३६ मोबाईल लंपास केल्याची कबुली दिली . सदर मोबाईलची किमंत  लाख ७० हजार रूपये असून सर्व मोबाईल त्याच्याकडुन हस्तगस्त करीत त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली असून असा  एकुण  लाख १०हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


 

फ्लिपकार्ड  कंपनीचे गोदाम फोडून कपडेचोरही गजाआड..

   

दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी जैद अब्दुल खालीक अन्सारी   मायकल याही चोरट्याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात अधिक चौकशी केली असता फ्लिपकार्ड कंपनीच्या  गोडावुनमधुन त्यांनी लंपास केलेले शर्टपॅन्टशर्ट पिसकोटलॅपटॉप कवरमोबाईल कवरफेस शिल्डएल सी डी स्टॅन्ड असा एकुण ५४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहेतसेच आणखी काही   मुद्देमाल त्यांनी कोठुन चोरला आहे का ? याचा तपास पोलिसांनी सुरु केलातर  या  गुन्हयातील  आरोपी  अद्यापही फरार असून पोलिसांकडून  त्यांचा  शोध सुरु असल्याची माहिती  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सुभाष कोकाटे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक  दिपेश किणी करीत आहेत.

भिवंडी पोलिसांनी आवळल्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त भिवंडी पोलिसांनी आवळल्या अट्टल  चोरट्यांच्या  मुसक्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त Reviewed by News1 Marathi on June 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पीडीतेला व तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची रिपाईच्या वाहतूक आघाडीची मागणी

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली असून या प्रकरणातील दोषी...

Post AD

home ads