Header AD

क्लिअरटॅक्सला मिळाली नवी ओळख


क्लिअर’द्वारे कंपनीच्या सर्व समावेशक सुविधांची श्रेणी एकाच छताखाली होणार उपलब्ध...


मुंबई, २९ जून २०२१ : क्लिअरटॅक्स या भारतातील आघाडीच्या फिनटेक सास कंपनीने कर, पावत्या, मालमत्ता व्यवस्थापन आणि व्यवसायांसाठीचे कर्ज अशा सर्वसमावेशक सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आज ‘क्लिअर’या एकछत्राचे अनावरण केले. दशकभराच्या प्रवासात या कंपनीने ई-फायलिंग टॅक्स प्लॅटफॉर्मपासून पूर्णपणे वित्तीय सेवा प्रदात्यापर्यंत विस्तार केला आहे.‘क्लिअर’ च्या ओळखीनुसार, कंपनीने स्पष्ट केले की, क्लिअरटॅक्स ब्रँडला पूरक असलेल्या अचूकता, सुरक्षा आणि विश्वासार्हतेच्या परंपरेनुसार उत्तम उत्पादने प्रदान केली जातील. क्लिअरटॅक्स लाखो भारतीयांमध्ये लोकप्रिय झालेले करसुविधा (प्राप्तीकर आणि जीएसटी) सुरूच ठेवेल.क्लिअरचे संस्थापक आणि सीईओ, अर्चित गुप्ता म्हणाले, “करभरणा सोपा करण्यासाठी आम्ही कंपनी स्थापन केली. गेल्या काही वर्षांपासून आम्ही करांच्याही पलिकडे धाव घेतली असून मोठ्या प्रमाणावर वृद्धी केली. सध्या आम्ही जोडलेल्या उद्योगांसाठी कर, पावत्यांकरिता सासची सुविधा देतो आणि संपत्ती व्यवस्थापनाचीही सुविधा पुरवतो. पावत्या, संपत्ती व्यवस्थापन, कर्ज आणि इतर अनेक क्षेत्रांसाठी भारतीयांना सेवा पुरवण्याचे मोठे उद्दिष्ट क्लिअरद्वारे साध्य केले जाते. २०२३ मध्ये क्लिअरला १ ट्रिलिअन डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या पावत्या व्यवस्थापित करण्याची अपेक्षा आहे.”२०११ मध्ये लाँच झालेल्या क्लिअरटॅक्सने वैयक्तिक करदात्यांना त्यांचे प्राप्तिकर विवरण भरण्यात मदत करणारा ऑनलाइन टॅक्स कम्पायलन्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आफला प्रवास सुरू केला. जीएसटी येताच, कंपनीने व्यवसायाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करणारी अनेक उत्पादनांमार्फत ग्राहकांपर्यंत खोलवर पोहोच वाढवली.कंपनीने क्लिअरजीएसटी, क्लिअर ई-इनव्हॉइसिंग, बिझनेससाठी क्लिअरवन, टॅक्स एक्सपर्टसाठी क्लिअरप्रो, वैयक्तिक करदात्यांसाठी ब्लॅक अशा सुविधा सुरु केल्या. क्लिअरने तंत्रज्ञान आणि उत्पादनाला प्राधान्य देणारी कंपनी अशी ओळख निर्माण केली आहे. वेब-ओन्ली क्लाउड आधारीत स्वरुपापासून आता वेब, डेस्कटॉप, मोबाइल आणि एपीआयपर्यंत कंपनीने प्रगती केली आहे. पोर्टफोलिओमध्ये नवीन जोड म्हणजे वापरण्यास सोपे असलेले क्लिअर-वन. एसएमईंसाठीचे हे एकछत्री इनव्हॉइसिंग आणि कंपायलन्स सोल्युशन आहे. मागील १२ महिन्यांत, कंपनीने बिझनेस आणि व्यक्तींसाठी सहजता आणण्यावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले. याकरिता भारतीयांना वित्तपुरवठा सोपा होण्यासाठी ४ मोबाइल अॅप लाँच करण्यात आले.आज, क्लिअर भारतातील २००० पेक्षा जास्त मोठे ब्रँड आणि कॉर्पोरेशन तसेच ५ दशलक्षांपेक्षा जास्त वैयक्तिक करदात्यांना सुविधा पुरवते. भारतातील बी२बी इन्व्हॉइसपैकी १० टक्क्यांवर कंपनी प्रक्रिया करते, त्याचे व्यावसायिक वार्षिक मूल्य ३०० अब्जांपेक्षा जास्त असून भारतातील एकूण प्राप्तिकर रिटर्न्सपैकी याचा वाटा १० टक्के एवढा येतो. मागील वर्षी या फिनटेक कंपनीने ४ लाखांपेक्षा जास्त व्यवसायांकरिता १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे वाचवले. तसेच, कंपनीने १३० दशलक्ष भारतीयांना दरवर्षी वेबसाइटद्वारे वैयक्तिक वित्तव्यवस्थापन समजण्यास मदत केली. तसेच कंपायलन्स सुविधांद्वारे २ दशलक्ष मानवी-तासांची बचत केली.

क्लिअरटॅक्सला मिळाली नवी ओळख क्लिअरटॅक्सला मिळाली नवी ओळख Reviewed by News1 Marathi on June 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads