Header AD

केडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील  त्रिमूर्ती नगर झोपडपट्टी येथील समाज मंदिराची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या समाज मंदिराची डागडुजी करावी अशी मागणीचे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आले होते.पालिकेने समाज मंदिराची डागडुजी करण्यासाठी टाळाटाळ केली. विशेष म्हणजे सध्यस्थितीत तर या प्रस्तावाची फाईल पालिकेकडून गहाळ झाल्याचे समोर आले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेतील अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप तर्फे करण्यात आली आहे.   

        त्रिमूर्तीनगर येथे  गेली अनेक वर्ष महपालिकेकडून बांधण्यात आलेले समाज मंदिर आहे. या समाज मंदिरात विविध सण समारंभविविध सभांचे आयोजन करण्यात येत असे. मात्र जवळपास तीन ते चार वर्ष या समाज मंदिरावरील पत्रे गळत असून पूर्ण खराब झाले आहेत. यासाठी नगरसेवक साई शेलार यांनी यासंदर्भात पत्र व्यवहार केला होता. त्यानंतर त्या प्रस्तावाची फाईल देखील तयार करण्यात आली.मात्र या फाईलवर पालिकेतर्फे ही जागा पालिका हद्दीत नाही तसेच या समाज मंदिरावरून टाटा पॉवर वीजवहिनी जात असल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळला.  
         त्यानंतर पुन्हा  भाजपा नगरसेवक साई शेलार यांनी यासाठी पाठपुरावा केल्यानंतर अचानक या प्रस्तावावर शेरा मारलेली फाईल पालिकेकडून गहाळ झाल्याची माहिती समोर आली. ही जागा महापालिकेची नाही तर मग दरवर्षी महापालिका जवळपास एक करोड रुपये या वस्तीवर कसे खर्च करते असा प्रश्न भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि पदाधिकारी राजू शेख यांनी उपस्थित केला.याबाबत कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांना विचारले असता ही जागा वादग्रस्त आहे. त्यामुळे या प्रस्तावाची फाईल नगररचना विभागाकडे पाठवण्यात आली होती. आता त्यांनी ही फाईल  कुठे ठेवली आहे  सापडत नाही. फाईल शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

केडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे समाज मंदिराची फाईल गहाळ. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी केडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे  समाज मंदिराची फाईल गहाळ. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads