Header AD

इमार्टिकस लर्निंगचा फिनटेक करिता एमबीए प्रोग्राम


#बँकिंग आणि फायनान्स मधील बीबीए प्रोग्रामची देखील केली घोषणा 


मुंबई, २२ जून २०२१ : भारतातील आघाडीची व्यावसायिक शिक्षण संस्था इमार्टिकस लर्निंग, प्रतिष्ठित JAIN Online (डीम्ड-टू-बी युनिव्हर्सिटी) च्या सहकार्याने विविध प्रोग्राम सुरु करत आहे. एक स्किलिंग पार्टनरच्या स्वरुपात भविष्यात नोकऱ्यांसाठी आवश्यक योग्य कौशल्ये विद्यार्थ्यांना प्राप्त होण्याप्रति आपली वचनबद्धता अधोरेखित करत ही भागीदारी, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि इक्विटी रिसर्चमध्ये एमबीए, फिनटेकमध्ये एमबीए आणि बँकिंग व फायनान्समध्ये बीबीए अभ्यासक्रमात यूजीसी-मान्यताप्राप्त ऑनलाइन प्रोग्राम प्रदान करत आहे. जागतिक पातळीवरील कोर्स एक व्यापक तंत्रज्ञान सक्षम अभ्यासक्रमाच्या माध्यमातून व्यवहार्य अॅप्लीकेशन्स आणि आधुनिक सोल्युशनचे ज्ञान प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.         गुंतवणूक बँकिंग आणि इक्विटी संशोधनात एमबीए प्रोग्राम, नव्या काळातील गुंतवणूक बँकिंग ऑपरेशन्समधील प्रत्येक पैलूला संरक्षण देत विद्यार्थ्यांना गुंतवणूक बँकिंग डोमेनच्या प्रमुख तत्त्वांविषयी अधिक सखोलपणे माहिती प्राप्त करण्याची संधी देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. उद्योगातील तज्ञांकडून व्यावहारिक प्रशिक्षण देत एक वेगळा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील व्यावसायिक अडचणींवर मात करण्यासाठी सक्षम बनवेल. यासाठी एक अप्रतिम, तंत्रज्ञान सक्षम अनुभव प्रदान केला जाईल. यामुळे ते भविष्यासाठी तयार होतील. एक वेगळ्या गुंतवणूक बँकिंग अभ्यासक्रमासह हा प्रोग्राम बेस्ट इन क्लास शिकण्याच्या अनुभवासाठी उद्योग भागीदारी आणि व्यापक करिअर समर्थन प्रदान करेल.         प्रोग्राममधील विद्यार्थ्यांना फायनान्शिअल अॅनलिस्ट, इन्व्हेस्टमेंट बँक असोसिएट, रिस्क मॅनेजमेंट कंसल्टंट, मनी मार्केट अॅनलिस्ट, ग्लोबल फायनान्स रिसर्चर, मनी मार्केट अॅनलिस्ट, फायनान्शिअल मार्केट अॅडवायझर, कॉर्पोरेट बँकिंग ट्रेझरर आणि अँटी मनी लाँडरींग स्पेशलिस्टसह इतर प्रतिष्ठित क्षेत्रांत करिअरच्या संधी प्रदान करतो.        इमार्टिकस लर्निंगचे संस्थापक आणि एमडी श्री निखिल बार्शीकर म्हणाले, “ आम्हाला एक स्किलिंग पार्टनरच्या रुपात JAIN Online (डीम्ड टू-बी युनिव्हर्सिटी) सारख्या प्रतिष्ठित संस्थानासोबत भागीदारी करताना आनंद होत आहे. या भागीदारीच्या माध्यमातून आमचे उद्दिष्ट, आजच्या शिक्षणार्थींना बँकिंग आणिफायनान्ससह विविध क्षेत्रात बीबीए आणि एमबीएमध्ये बेस्ट ऑनलाइन कोर्स प्रदान करण्याचे आहे.       या भागीदारीमुळे, उमेदवारांना संबंधित डोमेनममध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी योग्य कौशल्य समूह विकसित करणे आणि भविष्यातील नोकऱ्यांसाठी तयार होण्यास मदत मिळेल. हे सर्व विकसित तंत्रज्ञानावर आधारीत असेल. दृढ संबंधाची आम्ही आशा करतो आणि येत्या काही महिन्यांमध्ये आणखी नवे अभ्यासक्रम सुरु करण्याची मालिका सुरूच ठेवूत.”

इमार्टिकस लर्निंगचा फिनटेक करिता एमबीए प्रोग्राम इमार्टिकस लर्निंगचा फिनटेक करिता एमबीए प्रोग्राम Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads