Header AD

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते विटाव्यात. दोन मोफत रुग्णवाहिकेचे सोहळा संपन्न

 




कळवा , अशोक घाग :  कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कळवा विटावा खारेगाव परिसरात अनेक गंभीर रुग्णांचे रूग्णवाहिका अभावी मृत्यू झाले आहेत असे असताना भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेत कळवा विटावा परिसरातील नागरिकांचे जीव वाचावेत त्याना रुग्णवाहिकांची तातडीने मोफत मदत व्हावी.



         रुग्णालयात पोहचण्यासाठी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध व्हाव्या या हेतूने विटावा येथील बांधकाम विकासक व समाजसेवक संतोष तोडकर यांच्या  पत्नी स्वर्गीय माला संतोष तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विटावा येथे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.




       वेळी या रुग्णवाहिकांचा कमीत कमी उपयोग व्हावा भविष्यात येणारी कोरोनाची तिसरी लाट ही घातक असून 60 टक्के नागरिक हे मास्क चा वापर करत नाही त्यामुळे सर्व नागरीकांनी मास्क घालण्याचे आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे..



           या वेळी नवी मुंबई महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते विजय चौघुले, राष्ट्रवादीचे युवा नेते मंदार केणी, माजी नगरसेवक राजेश गवारी, शिवसेना विभाग प्रमुख अविनाश पाटील, अनु आंग्रे, तकी चेउलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या



         2 तसेच कळवा-विटावा गणपती पाडा सुर्यानगर या परिसरातील नागरिकांनी कोरोना शिवाय व दुसरा कोणताही आजार असल्यास आणि रुग्णवाहिकेची गरज भासल्यास  आमच्याशी  संपर्क साधावा  आयोजक संतोष तोडकर यांनी सांगितले..

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते विटाव्यात. दोन मोफत रुग्णवाहिकेचे सोहळा संपन्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते विटाव्यात. दोन मोफत रुग्णवाहिकेचे सोहळा संपन्न Reviewed by News1 Marathi on June 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads