Header AD

सकल आदिवासी संस्था ग्रुपची किन्नरांना मदत

 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) सामाजिक बांधिलकी म्हणून सकल आदिवासी संस्था ग्रुपच्या वतीने किन्नरांना मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना काळात किन्नरांनाहि पोटाची खळगी कशी भरावी याची चिंता सतावित होती.परंतु या संस्थेने केलेली हि मदत आभाळाएवढी असल्याचे यावेळी किन्नरांनी सांगितले. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत त्यांना संस्थेचे किन्नरांना धान्य वाटप केले.यावेळी राजश्री पाजनकर आणि रोटरी क्लब डोंबिवलीचे मेंबर सुरेश पाजनकर उपस्थित होते.      यावेळी पाजनकर म्हणाल्या,आमच्या संस्थेने किन्नरांना केलेल्या मदतीची पोस्ट अनेकांनी वाचली. त्यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी रोटरी क्लब च्या माध्यमातून किन्नरांना धान्य वाटप केले. रोटरी क्लब हा फार मोठा समूह आहे. इतक्या मोठ्या समुहाला आमच्या पासून प्रेरणा मिळणं हीच आमच्या साठी खूप महत्वाची बाब आहे. रोटरी क्लब त्यांच्या माध्यमातून खूप मोठे कार्य करत असते.   रोटरी क्लब डोंबिवली आपले मनापासून आभार मनात असून  आमच्या या उपक्रमा मुळे आपण सुध्दा प्रेरणा घेऊन आमच्या या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. मुख्य म्हणजे मला बोलवून तुमच्या उपक्रमात सहभागी केल्याने सकल आदिवासी संस्थेचे आभारी आहोत.

सकल आदिवासी संस्था ग्रुपची किन्नरांना मदत सकल आदिवासी संस्था ग्रुपची किन्नरांना मदत Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads