Header AD

श्याम मेटॅलिकने ओएफएस साइज २०० कोटींनी कमी केला आयपीओ साठी हे नकारात्मक आहे का?
मुंबई, ९ जून २०२१ : श्याम मेटॅलिक आयपीओ १४ जून २०२१ रोजी उघडणार आहे. यापूर्वी त्यांनी आयपीओची साइज ११०९ कोटींचा असून, फ्रेश इश्यू ६५७ कोटी रुपये आणि ४५२ कोटी रुपयांचे स्टॉक प्रमोटर्स किंवा शेअरहोल्डर्ससाठी विक्रीकरिता असल्याचे जाहीर केले होते. आयपीओच्या ९०० कोटी रुपयांच्या साइजला रिजेक्शन आल्याने, प्रमोटर ग्रुपकडून ऑफर फॉर सेल ४५२ कोटी रुपयांवरून कमी करून २५२ कोटी रुपये एवढी करण्यात आली असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी रिसर्च असोसिएट श्री यश गुप्ता यांनी सांगितले.        प्रमोटर ग्रुप पातळीवर आरामदायी लिक्विडिटी पोझिशन दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला. तसेच उद्योगासाठी अनुकूल अंदाज आल्याने विक्रीच्या भागाची ऑफर कमी करण्यास भाग पाडले असावे. या घटनेचा इश्युवर काही नकारात्मक परिणाम होईल, असे आम्हाला वाटत नाही. स्टील स्टॉकमधील वृद्धी आणि कंपनीची क्लीन बॅलेन्स शीट, यामुळे श्याममेटॅलिकच्या आयपीओसाठी आम्ही सकारात्मक असल्याचे ते पुढे म्हणाले.

श्याम मेटॅलिकने ओएफएस साइज २०० कोटींनी कमी केला आयपीओ साठी हे नकारात्मक आहे का? श्याम मेटॅलिकने ओएफएस साइज २०० कोटींनी कमी केला आयपीओ साठी हे नकारात्मक आहे का? Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads