Header AD

नवीन रेल्वे मार्गासाठी अनेक घरांवर बुलडोझर..पावसाळ्यात साईनाथ वाडी वस्तीवर कारवाई


 डोंबिवली ( शंकर जाधव )  नवीन फ्रेट रेल्वे डबल लाईन ( डेडीकेट फ्रेट कॉरीडाॅर ) विशेष रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासन जागा ताब्यात घेण्यास सुरुवार करत आहे.डोंबिवली पूर्वेकडील आयरेरोडवर अनेक वर्षापासून वसलेल्या साईनाथवाडी वस्तीवर रेल्वे प्रशासनाने बुधवारी बुलडोझर फिरवला.या कारवाईसाठी रेल्वे पोलीस बळ, स्थानिक पोलीस यांचा बंदोबस्त होता.या वस्तील रहिवाश्यांना एक महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने नोटीस दिली होती. 
       कोरोनाचे संकट आणि पावसाचे दिवस यात झालेल्या या कारवाईमुळे वस्तीतील  नागरिकांची तांबाबळ उडाली होती.यातील काही लाभार्थ्यांना घराच्या बदल्यात घरे तर काहीना ठरवलेली रक्कम देण्यात आली होती डोंबिवली पुर्वेकडील आयरे रोडवरील साईनाथ वाडी वस्ती रेल्वेच्या जागेत वसली आहे.या जागेवर फ्रेट रेल्वे डबल लाईन ( डेडीकेट फ्रेट कॉरीडाॅर ) विशेष रेल्वे प्रकल्प सुरु होणार आहे.या वस्तीतील २७६ झोपडीधारक असून  त्यातील १०५ लाभार्थ्यांना ठरलेल्या रकमेप्रमाणे १४ लाखांपैकी १० लाख रुपये देण्यात आले आहे. 

           आणखी २० लाभार्थ्यांना ठरलेली रक्कम देण्याचे बाकी आहे. तर उर्वरित  ९७ लाभार्थ्यांना ४ लाख रुपये घरे खाली केल्यावर मिळणार आहेत.तर उर्वरित लाभार्थ्यांना घराच्या बदल्यात घरे देणार आहोत.यातील ५४ अपात्र झोपडीधारकांची कोकण भवन येथे सुनावली आहे, अशी माहिती यावेळी भा.रे. इंजीनियर सेवा महाप्रबंधक ( सिविल ) मुंबई ( दक्षिण ) विकास कुमारयांनी दिली.

         तर साईनाथ वाडी वस्तीतील रहिवाशी भूजंग कांबळे म्हणाले, आम्हाला डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली येथील बीएसयुपी प्रकल्पातील घरे द्यावीत अशी मागणी केली होती.मात्र रेल्वे प्रशासन कचोरे येथील बीएसयुपी प्रकल्पातील घरे देत आहेत.दरम्यान पावसाळ्यात रेल्वे प्रशासनाने कारवाई  केल्याने परिसरात चर्चा सुरु होती.

नवीन रेल्वे मार्गासाठी अनेक घरांवर बुलडोझर..पावसाळ्यात साईनाथ वाडी वस्तीवर कारवाई नवीन रेल्वे मार्गासाठी अनेक घरांवर बुलडोझर..पावसाळ्यात साईनाथ वाडी वस्तीवर कारवाई Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads