Header AD

युनिव्हर्सल ह्यूमन राईटस कौन्सिलच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी राजेंद्र पाटील.

 
भिवंडी : दि 18(प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील लाखीवली गावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र रघुनाथ पाटील यांची युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत या संघटनेच्या   ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
 युनिव्हर्सल ह्यूमन राईटस कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष क्रांतिकारी  डॉ.तरुणजी बाकोलिया, राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ.सुमनची मौर्या यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जीवन शंकरराव निकम, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सुवर्णाताई सुनिल कदम, महाराष्ट्र कार्याध्यक्ष जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या सूचनेनुसार राजेंद्र पाटील यांची त्यांच्या समाजसेवी वृत्ती आणि समाजात आज पर्यंत केलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत या संघटनेत  ठाणे जिल्हा अध्यक्ष या पदावर राजेंद्र  पाटील यांची  नियुक्ती करण्यात आली आहे .           राजेंद्र पाटील हे भिवंडी तालुक्यात विविध संस्थांवर काम करत असून या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्ह्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे राजेंद्र पाटील हे तालुक्यात जिल्हा परिषद गटाचे संपर्क सचिव, समाज कल्याण न्यासचे विभाग प्रमुख,  माजी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा शिक्षकेतर संघटना भिवंडी तालुका,आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका सदस्य, आगरी समाज उन्नती मंडळ दहागाव गट सदस्य, ग्रामशिक्षण समिती शाळा लाखिवली चे माजी अध्यक्ष, पोलीस जनता परिवर्तन दल ठाणे  जिल्हा सदस्य,स्व. धर्मवीर आनंद दिघे साहेब सामाजिक संस्था भिवंडी सदस्य, आगरी महोत्सव भिवंडी उपाध्यक्ष, भिवंडी वार्ताहर संघ सदस्य, भिवंडी तालुका ग्रामीण समालोचक संघटना उपाध्यक्ष, शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सदस्य, शिव संकल्प प्रतिष्ठान भादवड  भिवंडी सदस्य, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य सदस्य ,शांतता मोहल्ला कमिटी भिवंडी तालुका  पोलीस स्टेशन सदस्य , ठाणे जिल्हा बॉक्स लंगडी  असोसिएशन  उपाध्यक्ष,  कोषाध्यक्ष ठाणे जिल्हा शिक्षकेतर संघटना,उत्कृष्ट समालोचक , उत्कृष्ट सूत्रसंचालक,भिवंडीचा बुलंद आवाज अशा विविध ठिकाणी आज भिवंडी तालुक्यात जिल्ह्यात व राज्यात कार्यरत आहेत, राजेंद्र पाटील हे नेहमीच समाज सेवेमध्ये पुढे असतात गेल्या वर्षी आलेल्या कोरोना विषाणूने भारतातच नाही तर जगभर थैमान घातले होते              या काळामध्ये राजेंद्र पाटील यांनी गोरगरिबांना विविध संस्थांच्या माध्यमातून व स्वतःच्या प्रयत्नाने जेवणाचे डब्बे,जीवनावश्यक वस्तू, रुग्णांना रक्त पुरवठा, रुग्णांना दवाखान्यात ऍडमिट करणे अशी कामे त्यांनी कोरोना काळात केलेली आहेत .राजेंद्र पाटील यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत २०११साली प्रभात गौरव पुरस्कार (उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल ), २०१५साली आगरी समाज भूषण पुरस्कार (आगरी समाजाच्या वतीने सामाजिक ,शैक्षणिक , राजकीय व क्रीडा क्षेत्रात  उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल),
२०१९साली शिव संकल्प प्रतिष्ठान भिवंडी च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिते बद्दल पुरस्कार , २०२०साली शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल कोकण गुणवंत राज्यस्तरीय पुरस्कार .             २०२०साली आगरी महोत्सव२०२० टॉप टेन मध्ये निवड सामाजिक क्षेत्र आगरी  भूषण पुरस्कार,२०२०साली शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उत्कृष्ट A1 सूत्रसंचालक  ठाणे जिल्हा  पुरस्कार, २०२०  साली शिवसेना शाखा टेंभवली यांच्यावतीने  कोरोना योद्धा पुरस्कार ,२०२० साली दैनिक मलंग रत्न  मलंग गड यांच्यावतीने मलंग रत्न कोरोना योद्धा पुरस्कार,२०२०साली MDS TV NEWS भिवंडी यांच्यावतीने कोरोना योद्धा पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत  राजेंद्र पाटील यांची ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष  पदि निवड झाल्याने भिवंडी तालुक्याच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ..
युनिव्हर्सल ह्यूमन राईटस कौन्सिलच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी राजेंद्र पाटील. युनिव्हर्सल ह्यूमन राईटस कौन्सिलच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी राजेंद्र पाटील. Reviewed by News1 Marathi on June 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads