Header AD

पर्यावरण दिनाला झाड लावा आणि महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवर झळका वृक्ष संवर्धनासाठी केडीएमसीचा उपक्रम

 कल्याण , प्रतिनिधी  : वृक्ष संवर्धनासाठी केडीएमसीने पुढाकार घेतला असून येत्या पर्यावरण दिनाला किमान १ झाड लावा आणि महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवर झळका हा उपक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आयोजित केला आहे. 

  

वृक्ष लागवडीमुळे आजूबाजूचा परिसर सदाहरित होतो आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बहुमोल मदत होते. त्यामुळेच यावर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त महापालिका एक अनोखी संकल्पना राबवित असून ५ जून रोजी "पर्यावरण दिनी" महानगरपालिका क्षेत्रात किमान १ झाड लावून त्यासमवेत स्वत:चा सेल्फी फोटो kdmcsocialmedia2020@gmail.com  या ई-मेल आयडीवर पाठविल्यास सदर फोटो महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवर प्रसिध्द केला जाईल.


महापालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा प्रादुर्भाव पाहतासध्याच्या काळात ऑक्सिजनचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेता जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नागरिकांच्या सहयोगाची देखील अत्यंत आवश्यकता असून पर्यावरण दिनी म्हणजेच ५ जून रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या झाडे लावा आणि आपला सेल्फी पाठवा या नवीन संकल्पने साठी जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.


पर्यावरण दिनाला झाड लावा आणि महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवर झळका वृक्ष संवर्धनासाठी केडीएमसीचा उपक्रम पर्यावरण दिनाला झाड लावा आणि महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवर झळका वृक्ष संवर्धनासाठी केडीएमसीचा उपक्रम Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads