Header AD

ठामपाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश सुरु

                                                                



ठाणे ,  प्रतिनिधी  ;  ठाणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून 'गूगल फॉर्म' भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.



                महापालिकेच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक वर्गासाठी दोन वेगवेगळे गूगल फॉर्म तयार करण्यात आले आहेत. 



               यामध्ये १ ली ते ८ वी या प्राथमिक वर्गासाठी https://forms.gle/cgHgaEXmjMrDH1BJA तर ९ वी ते १० वी या माध्यमिक वर्गासाठी https://forms.gle/rCZwCHspM2sy9NsA7 या लिंकवर जावून 'गूगल फॉर्म' भरावा.  तसेच सदरची लिंक महापालिकेच्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली असून पालकांनी 'गूगल फॉर्म' भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.



ठामपाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश सुरु ठामपाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश सुरु Reviewed by News1 Marathi on June 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads