Header AD

आगामी ठाणे महापालिका निवडणुकी साठी सज्ज व्हा - राजेश शर्माठाणे , प्रतिनिधी  :   ठाण्यात व राज्यात काँग्रेस पक्षात काय चर्चा सुरू याची चिंता न करता काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी येत्या काही महिन्यांतच येत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व ठाणे जिल्हा प्रभारी राजेश शर्मा यांनी काल ठाण्यातील काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत केले.            ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेसच्या शहर पदाधिकारी,ब्लाॅक अध्यक्ष,प्रदेश सदस्य व विभागीय अध्यक्ष यांची मासिक बैठक टीपटाप प्लाझा येथे आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तारीक फारूकी,प्रदेश सचिव व ठाणे प्रभारी मेहूल व्होरा,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,जेष्ठ नेते सर्जेराव शिंदे,ठाणे महापालिका काँग्रेस गटनेत्या दिपाली भगत,माजी नगरसेवक बशीर बापे,गुरूनाथ पाटिल,शितल आहेर,प्रदेश सदस्य राजेश जाधव,प्रदिप राव,सुखदेव घोलप,जे.बी.यादव,राम भोसले,युवक अध्यक्ष आशिष गिरी,आकाश रहाटे आदि पदाधिकारी उपस्थित होते.              याप्रसंगी बोलताना राजेश शर्मा यांनी सागितले की,राज्यात काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे नुकतेच प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी जाहीर केले आहे त्याच अनुषंगानेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात,राज्यात काय चर्चा चालू आहे याचा विचार न करता आपापल्या प्रभागात अधिक सक्रिय झाले पाहिजेत,प्रदेशाध्यक्ष यांनी दिलेल्या आदेशानुसार बुथस्तरावर सघटना बांधनीकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.              याप्रसंगी बोलताना प्रदेश सरचिटणीस यांनी ठाण्यातील काँग्रेस पक्षाध्यक्षाबाबत विविध चर्चा सुरू असून अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून काही मोजकेच महिने महापालिका निवडणुकीसाठी राहिले असल्याचे लक्षात आणून दिले व पदाधिकाऱ्यांनी आपला आपले लक्ष आपल्या वार्डात केंद्रित करावे अशा सूचना केल्या.            याप्रसंगी माजी काँग्रेस गटनेते संजय घाडीगावकर यांनी सागितले की आपापसातले मतभेदच काँग्रेसला हरवू शकतात हा आतापर्यंतचा अनुभव असून आता तरि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पणे काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. 


        

           शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांनी मागील वर्षभरात केलेला कामाचा आढावा सादर करित असताना भविष्यात बुथस्तरापासूनच संघटना अधिकाधिक मजबूत कसा करता येईल याकरिता लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा इंटक काॅग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केले.

आगामी ठाणे महापालिका निवडणुकी साठी सज्ज व्हा - राजेश शर्मा आगामी ठाणे महापालिका निवडणुकी साठी सज्ज व्हा - राजेश शर्मा Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads