Header AD

सम्राट अशोक विद्यालयाचा अनोखा आदर्श

 

कोरोना योद्धा पालक प्रतिनिधी पोलीस हवलदार चंदू साबळे यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षाला सुरुवात.कल्याण , कुणाल  म्हात्रे   :   कोरोनामुळे मागील वर्षांपासून शाळा बंद ऑनलाइन शिक्षण सुरु अशी शैक्षणिक अवस्था आहे. या शैक्षणिक वर्षांची सुरवात *सम्राट अशोक विद्यालय कल्याण या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कोराना योद्धा  पालक प्रतिनिधी पोलीस हवालदार चंदू साबळे यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून सुरुवात केली.            प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून शाळेच्या प्रार्थनेसह परिपाठ घेतला. इतर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परिपाठला उपस्थिती दर्शविली. पालक प्रतिनिधी चंदू  साबळे यांचा कोरोना योद्धा म्हणून शाळेने सत्कार केला. चंदू साबळे यांनी आपल्या ऑनलाईन  मनोगतातून कोरोनामुळे येणाऱ्या अफवांपासून विद्यार्थ्याना लांब राहण्यास सांगितले.              पुढे कोणती लाट येईल याला घाबरू नका. आपण आपल आरोग्य  सांभाळत घरी अभ्यासाबरोबर इतर कला जोपासत सकाळी लवकर उठून व्यायाम, योगा करत वाचन लेखनाचा सराव करा  असे म्हणाले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय,  माध्यमिक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका  सुजाता नलावडे व प्राथमिक माध्यमिक विभागाचे   शिक्षक उपस्थित होते.
सम्राट अशोक विद्यालयाचा अनोखा आदर्श सम्राट अशोक विद्यालयाचा अनोखा आदर्श Reviewed by News1 Marathi on June 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads