Header AD

दुध उत्पादक शेतकरी अडचणीत...रयत क्रांती संघटनेचे गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन
डोंबिवली ( शंकर जाधव ) दुधाला पाण्यापेक्षा कमी दर मिळत आहे. परिणामी दुध उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहे.त्यामुळे सरकराने गाईच्या दुधाला तीस रुपये बाजारभाव मिळावा अशी व्यवस्था करावी या मागणीसाठी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेने गुरुवार १० तारखेला सकाळी ७ ते १२ या वेळेत राज्यव्यापी आंदोलन पुकारलेले आहे अशी माहिती रयत क्रांती संघटना ओबीसी अध्यक्षा निर्मला कदम यांनी दिली.कदम म्हणाल्या कि, राज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी मित्र राज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे संकलन केले जाते. दुध उद्योगाची रोजची उलाढाल सुमारे १०० कोटी रूपयांची आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या १ कोटी २० लाखांच्या घरात आहे. लॉकडाऊनचा फायदा घेतात दुधाचे दर १० ते १८ रुपयांनी कुणी पाडलेदुधाचा महापूर आला ही अफवा आहे कापाण्याच्या भावात दूध खरेदी करणाऱ्या दूध संघांना सरकार अभय देतेय कारक्त आटवून दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला भाव का मिळत नाही?  शेतकऱ्यांच्या इतर ऊसकांदाकापूससोयाबीनकडधान्यफळबाग या सर्व पिकांची वार्षिक उलाढाल एका बाजूला व दूध उत्पादकांच्या दुधाची उलाढाल एका बाजूला अशाप्रकारचा दूध धंदा हा व्यवसाय आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना कोणत्याच शेतीमालाला उत्पादन खर्च भरून निघेल एवढेही किंमत मिळत नाही. तीच अवस्था दूध उत्पादकांची सुद्धा आहे.  सासारख्या पिकाला व इतर पिकांना एफआरपी व एमएसपीचा कायदा आहे. तसाच दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा कायदा हवा वास्तविक पाहता राज्य सरकार दरवर्षी दुधाचा  उत्पादन खर्च काढून किमती जाहीर करते. परंतु सदर किंमत कधीच शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे वेळोवेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावेच लागते .लॉक डाऊन च्या काळात शेतकऱ्यांनी दूध,फळे,फुले,भाजीपाला,धान्य,कडधान्य मोठ्या कष्टाने  देशाला पुरवलीत्यामुळे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला तीस रुपये बाजारभाव मिळावा अशी व्यवस्था करावी.यासाठीची सदरचे राज्यव्यापी आंदोलन आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेने पुकारलेले आहे यात बहुसंखेने सामिल व्हा असे आवाहन  रयत क्रांती संघटना ओबीसी अध्यक्षा निर्मला कदम यांनी केले आहे.

दुध उत्पादक शेतकरी अडचणीत...रयत क्रांती संघटनेचे गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन दुध उत्पादक शेतकरी अडचणीत...रयत क्रांती संघटनेचे गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads