Header AD

महाविकास आघाडीने ओबीसींचे राजकीय जीवन उध्वस्त केले - माजी आमदार नरेंद्र पवार


■ओबीसींचेचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये चक्का जाम आंदोलन..


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे    राज्य सरकारच्या नाकर्ते पणामुळे ओबीसींचे राजकीय जीवन उध्वस्त झाले असून याला महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे  माजी आमदार व भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार यांनी केला.सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची फेरविचार याचिका फेटाळली असून यामुळे राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. याला ठाकरे सरकार कारणीभूत असल्याच्या निषेधार्थ कल्याणच्या दुर्गाडी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार कपिल पाटीलओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पंडितकल्याण शहर मंडळाचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रेमोहना टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईरजिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रेओबीसी जिल्हा सरचिटणीस श्याम मिरकुटेउपाध्यक्ष विशाल शेलारनिखिल चव्हाणप्रिया शर्माराहुल भोईरगणेश कारभारी, संजय कारभारी, डॉ पंकज उपाध्याय, गौरव गुजर, प्रीती चित्तेमेघनाथ भंडारीविलास रंदवे, मोहन कोनकर यांसह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.राज्यातले ओबीसी आरक्षणाची सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनवारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने अजीबात गांभीर्य दाखविले नाही.सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील सुनावणी सुरू असताना १५ महिन्यांमध्ये किमान ८ वेळा सरकारने केवळ तारखा मागितल्या.  सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात पुढची कारवाई स्पष्टपणे विदित केलेली असताना केवळ वेळकाढू धोरण सरकारने अवलंबिले. यासंदर्भात मार्च 2021 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी विषय मांडला होता तसेच ओबीसी आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग तातडीने गठीत करावा लागेल आणि इम्पेरिकल डाटा सुद्धा तयार करावा लागेलअन्यथा ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी शासनाला सुचविले होते पण याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने ओबीसींना मोठा फटका बसल्याचे खासदार कपिल पाटील व नरेंद्र पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडीने ओबीसींचे राजकीय जीवन उध्वस्त केले - माजी आमदार नरेंद्र पवार महाविकास आघाडीने ओबीसींचे राजकीय जीवन उध्वस्त केले - माजी आमदार नरेंद्र पवार Reviewed by News1 Marathi on June 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads