Header AD

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखेच्या वतीने वृक्षारोपण

 

■वटसावित्री पौर्णिमा आणि छ. शाहू महाराज जयंती निमित्त उपक्रम...कल्याण , कुणाल  म्हात्रे  : वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्व भूमीवर आणि छ. शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकल्याण शाखेतर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम शनिवारी कल्याण पूर्वेकडीलपत्री-पूलाजवळील नेतवली टेकडीवरील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आला.संघटनेचे कार्यकर्ते हनुमंत देडगे यांच्या निवासस्थानी छ. शाहू महाराजांना अभिवादन करून नेतिवली टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी  पळसमहोगनीजांभूळसीताफळसागबांबूपळसबकुळ आदी प्रकारची ३० रोपे लावण्यात आली.महा. अंनिस द्वारा आयोजित या वृक्षारोपणास 'समता संघर्षसंघटनेचे प्रमुख शैलेश दोंदे, 'पुरोगामी विचार मंच'चे महाराष्ट्र राज्य प्रमुख बंडू घोडेव्यावसायिक जगदीश ठाकूर, 'अंघोळीची गोळीमोहिमेचे  तसेच महा अंनिसचे कार्यकर्ते अविनाश पाटीलमहा. अंनिस कल्याणडोंबिवली शाखेचे पदाधिकारीजिल्हा राज्य पदाधिकारी आणि अनेक जुने-नवे कार्यकर्ते तसेच स्थानिक तरुण मुले आणि समाजसेवक हजर होते. सर्वांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.वृक्षारोपणासाठी जागा निवडणेखड्डे खोदणेकार्यकर्त्यांना अल्पोपहार यासाठी हनुमंत देडगे यांनीनियोजनासाठी शरद लोखंडेदत्ता बोंबेतानाजी सत्वधीरशुशील माळी यांनी मेहनत घेतली. तसेच शाखा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी नियोजनासोबतच कृषि पर्यवेक्षक डी वाय कोळी यांच्या मदतीने रोपे उपलब्ध करून दिली.           वृक्षारोपण झाल्यावर शरद लोखंडे यांनी या कार्यक्रमा मागील संकल्पना समजाऊन सांगितली तसेच केवळ वृक्षा रोपण करूनच थांबायचे नाही तर ही रोपे जगविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मधून मधून वृक्षारोपण ठिकाणी येऊन रोपांना पाणी घालणेत्यांची निगा राखणे ही कामे सुद्धा करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले. अविनाश पाटील यांनी अंघोळीची गोळीखिळेमुक्त झाड या उपक्रमांची माहिती दिली. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखेच्या वतीने वृक्षारोपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखेच्या वतीने वृक्षारोपण Reviewed by News1 Marathi on June 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads