Header AD

डोंबिवलीत शाळे बाहेरच पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन


■सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न, शिक्षकां कडून पाठिंबा....


 

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली जवळील रिव्हरवूड पार्क (खिडकाली) येथील सीता बाई के.शहा मेमोरियल शाळे बाहेर पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभार विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन केले. विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायवर पालकांनी उचलेले हे पाउल सरकारचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

         या आंदोलनात दोन खाजगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण देत पाठिबा दिला आहे. न्याय मिळणार नाही तोपर्यत असे अनोखे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पालक वर्गानी पत्रकारांना सांगितले.   

             सीताबाई के. शहा मेमोरियल स्कूल रिव्हरवूड पार्क (खिडकाली) ता.जि.ठाणे. या शाळेचे संस्था अध्यक्ष भरत शहा यांनी सदर शाळा इ. १ ते इ. ७ वी पर्यंत स्टेट बोर्ड अभ्या सक्रम असणारी शाळा १३ वर्षा पूर्वी सुरु केली होती. सदर शाळेत खिडकालीरिव्हरवूड पार्कनिळजेदेसाईपडलेडायघरहेदूटने,कोळेगाव इत्यादी गावातील विद्यार्थी प्रवेश घेऊन शिकत आहेत. तसेच या शाळेने ८ वी,९वी,१०वीचे देखील विना परवानगी वर्ग सुरु केले होते. 
    अचानक पणे सदर शाळा संचालकांनी बेकायदेशीर रित्या स्टेट बोर्ड अभ्यासक्रम बंद करून सीबीएसई शाळा सुरु करण्याची हालचाल सुरु केली व सदर शाळेतील सर्व पालकांना  सीबीएसई  बोर्डाची वार्षिक फि ७०,००० रुपये केली. ७०,००० रु.फी देण्यास पालकांनी नकार दिला व `आम्हाला सीबीएसई  बोर्ड नको आम्हाला स्टेट बोर्डच हवा` अशी मागणी केली. 
       १४ जून रोजी महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या शाळा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत व त्यानुसार सर्व शाळा सुरु झाल्या आहेत.परंतु सीताबाई के.शहा शाळा संचालक भरत शहा यांनी सदर शाळा सुरु केली नाही. त्यामुळे सीताबाई के. शहा शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.      याबाबत पालकांनी गेल्या सहा महिन्यात संबंधित सर्व विभागांना निवेदने दिले. त्यानुसार ११ फेब्रेवारी रोजी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे पालकांनी तक्रार केली असता  सीताबाई के.शहा मेमोरियल स्कूलचे अध्यक्ष यांना पत्र देऊन कळविले आहे की आपण सीबीएसई मंडळाच्या अभ्यास क्रमाशी संलग्न अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही तरीही आपण सीबीएसई  मंडळाचा अभ्यास क्रम प्रवेश प्रक्रिया सुरु होती. 

         तसेच पुढील शैक्षणिक वर्षा करिता इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंत वर्गाना यापूर्वी राज्यमंड अभ्यास क्रमासाठी मान्यता मिळाली आहे तोच अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात यावा जेणे करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. असेही आदेश दिलेले आहेत.हे सर्व आदेश धुडकावून शाळेचे अध्यक्ष भरत शहा यांनी सदर शाळा बंद केली असल्याचा आरोप पालक वर्गानी या आंदोलनाच्या वेळी केला. 
      गेल्या सहा महिन्या पासून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद ( राजू पाटीलआमदार रवींद्र चव्हाणनगरसेवक बाबाजी पाटील,वपोनी डायघर पोलीस स्टेशन यांच्या बरोबर अनेक बैठका घेऊन शाळा सुरु करणेबाबत चर्चा करण्यात आली परंतु शाळेचे अध्यक्ष भरत शहा हे कुणालाही जुमानत नाही व दाद देत नसल्याचा आरोपही होत आहे.

      या विरोधात लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी शाळेतील पालकांनी सीताबाई के.शाह मेमोरियल शाळा रिव्हरवूड पार्कच्या गेटवर सोमवारी पासून बेमुदत प्रतिकात्मक रित्या शाळा सुरु करण्याचे आंदोलन आयोजित केले आहे. 


            सदर आंदोलन अँड. रामदास वायंगडेकाँम्रेड काळू कोमास्करनगरसेवक बाबाजी पाटीलपालक-  शाखा प्रमुख दिपेश पाटीलउत्तम पवार,राम म्हात्रेसंजय पाटीलसत्तेवान पाटीलरुपेश पाटीलनवनाथ पाटीलअवधूत घाडगेभूषण कोकाटेनवनाथ ठाकूरनवनाथ पवारमिलिंद पाटील यांच्या नेतृत्वा खाली सुरू करण्यात येणार आहे.

डोंबिवलीत शाळे बाहेरच पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन डोंबिवलीत शाळे बाहेरच पालकांचे प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads