Header AD

कल्याण ग्रामीण मधील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाने प्रभावित होऊन तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तालुकाप्रमुख वसंत लोणे यांच्या नेतृत्वाखाली कोसले गावचे भाजपा कार्यकर्ते व पळसोली सेवा सोसायटीचे उप चेअरमान लक्ष्मण भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां सह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी लता लक्ष्मण भोईर यांची पळसोली महिला उपविभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. 



            या प्रवेश प्रसंगी भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, भिवंडी तालुकाप्रमुख विश्वास थळे, ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती कुंदन पाटील, भिवंडी पंचायत समिती माजी उपसभापती प्रकाश भोईर, विष्णु चंदे, तालुका कार्यकारिणी सदस्य तुकाराम कडव, युवासेना जिल्हा सचिव अल्पेश भोईर, संपर्क प्रमुख कल्याण ग्रामीण रमेश बांगर तालुका सहकार अध्यक्ष अनिल चौधरी, युवासेना समन्वयक संतोष सुरोशी, तालुका सचिव नामदेव बुटरे तसेच  विभागातील  शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी  युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 तालुकाप्रमुख वसंत लोणे यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी एकमताने काम करावे याबाबत सूचना केल्या तसेच येत्या काही दिवसांत कल्याण ग्रामीण ची नवीन कार्यकारिणी निर्माण करण्याबाबत माहिती दिली. जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना सहकार्याच्या भावनेतून काम करावे असे सूचित केले.

कल्याण ग्रामीण मधील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश कल्याण ग्रामीण मधील भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads