Header AD

गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला केडीएमसीची परवानगी

  

■३३ खाजगी रुग्णालयांना खाजगी लसीकरण केंद म्हणून मान्यता.....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे तसेच महापालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 संभाव्य तिस-या लाटेचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी लसीकरण वेगाने करणे आवश्यक असल्यामुळे शासनाच्या धोरणानूसार खाजगी रुग्णालयांनादेखील कोविड लसीकरणा संबंधी मान्यता देणे बाबतचे धोरण महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केले असून त्यानुसार  सदर रुग्णालयांनी स्वखर्चाने वितरकाकडून लस खरेदी करुन योग्य ते शुल्क आकारुन लसीकरण करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेने 33 खाजगी रूग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.


          ज्या आस्थापना व गृहसंकुले वय वर्षे १८ व त्यापुढील नागरिकांसाठी सशुल्क लसीकरण करून घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सदर रूग्णालयांशी संपर्क करून लसीकरण करून घ्यावे. मान्यताप्राप्त खाजगी रूग्णालयांनी वितरकांकडून लस खरेदी करूनलस उपलब्ध असल्याची माहिती प्रसिद्ध करावी. या खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक प्रशिक्षित  मनुष्यबळअनुषंगिक वैद्यकीय सामग्री उपलब्ध करून शासनाच्या  कोविन पोर्टल मध्ये लाभार्थ्यांची आवश्यक माहिती भरून लसीकरण करावे.


          लसीकरणासाठी परवानगी दिलेल्या खाजगी लसीकरण केंद्रांच्या माहितीबरोबरच सदर धोरण हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला केडीएमसीची परवानगी गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला केडीएमसीची परवानगी Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads