Header AD

अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम केडीएमसीत सज्ज
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील अतिवृष्टीच्या काळात एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्य तातडीने करता यावे यासाठी एनडीआरएफची एक तुकडी तैनात करण्यात आली असून हि तुकडी नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे.    

             अतिवृष्टीच्या काळात एखाद्या ठिकाणी पूर आल्यास, इमारत पडल्यास, झाड पडल्यास अथवा इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास मदतकार्य करता यावे यासाठी एनडीआरएफच्या टीमने आपल्या साहित्याची चाचणी केली. यामध्ये ३ बोटी, ३ ओवर बोट मशीन, ३० लाईफ जॅकेट, ३० लाईफ बॉय, कटिंग साहित्य, हायरेस्ट, टॉवरलाईट, बॅटरी आदी साहित्य आहे. एनडीआरएफच्या या तुकडीत १८ जणांचा समावेश असून सुहास थोरात आणि अर्कीता जेना या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.             साहित्य तपासणी सोबतच या टिमचे शहरात राउंड मारणे सुरूच असून, खाडी किनारे, तसेच लो लाईन एरिया आदींची पाहणी करत आहेत. या एनडीआरएफ टिमच्या मदतीला केडीएमसीचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक निकम हे देखील आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत सज्ज आहेत.

अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम केडीएमसीत सज्ज अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम केडीएमसीत सज्ज Reviewed by News1 Marathi on June 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads