Header AD

भिवंडीत रेड लाईट एरियात वेश्या गमना साठी आलेल्या व्यक्ती कडून हवेत गोळीबार...




भिवंडी दि 28(प्रतिनिधी ) शहरातील देह व्यापार करणाऱ्या हनुमान टेकडी या भागात वेस्यागमनासाठी आलेल्या दोघा व्यक्तींपैकी एकाने परिसरात हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे . 



          एका कार मधून आलेल्या दोघा व्यक्तींनी एक महिले सोबत वेश्यागमान केल्यावर खोली बाहेर पडल्यावर कोणत्यातरी करणार वरून त्या दोघा व्यक्तीं पैकी एकाने गल्लीत उभे राहत आपल्या जवळील रिव्हॉल्व्हर मधून हवेत एक गोळी झाडीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला .



           या घटने नंतर परिसरात एकाच खळबळ उडाली असता सदरची व्यक्ती रस्त्यावर येऊन आपल्या कार जवळ आली असता स्थानिक नागरीकांनी त्याच्या दिशेने दगडफेक केली असता त्याने त्या ठिकाणी सुध्दा हवेत गोळीबार केल्याने तेथील दगडफेक करणारे पांगले याचा फायदा घेत गोळीबार करणारे त्या ठिकाणाहुन कार सह पसार झाले .




            दरम्यान स्थानिकांनी केलेल्या दगड फेकीत कारच्या काचा फुटल्या असून या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांना फरार आरोपींच्या कार चा नंबर मिळाला असून त्या दिशेने पोलिसांची पथके गोळीबार करून पसार झालेल्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत
.


         महिलेच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया शहर पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली असून या घटने नंतर परिसरातील महिलां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .
भिवंडीत रेड लाईट एरियात वेश्या गमना साठी आलेल्या व्यक्ती कडून हवेत गोळीबार... भिवंडीत रेड लाईट एरियात वेश्या गमना साठी आलेल्या व्यक्ती कडून हवेत गोळीबार... Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads