Header AD

शिक्षकांना लोकल प्रवासास परवानगी साठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे लक्षवेधी आंदोलन

 कल्याण, कुणाल  म्हात्रे  : शिक्षकांना लोकल प्रवासा करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कल्याण रेल्वे स्थानकात लक्षवेधी आंदोलन केले.१५ जून पासून राज्यातील शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबई उपनगरासह  ठाणे जिल्ह्यातील अनेक  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी रेल्वेने प्रवास करत असतात. परंतू कोव्हीड 19 मुळे रेल्वेने प्रवास करण्यास बंदी आहें. रेल्वे प्रवास करण्याची अनुमती द्यावी. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्रीशिक्षण मंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. परंतू अनुमती  मिळालेली नाही.इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता नववी व दहावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित दहावीच्या निकालाची कामे शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविली आहेत. ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य असल्याने मुंबई  उपनगरातून अनेक शिक्षक शाळेत येण्यासाठी निघाले असता  त्यांना स्टेशन वरती तिकीटे नाकारलीत त्यामुळे शिक्षकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कल्याण रेल्वे स्टेशन येथे कोव्हीड नियमांचं पालन करून लक्षवेधी आंदोलन केले.कल्याण रेल्वे स्थानक मूख्य व्यवस्थापक अनुप कुमार जैन यांना निवेदन देवून त्यांच्या मार्फत मध्य रेल्वे मुख्य व्यवस्थापक सीएसटी मुंबई यांच्याकडे तातडीने पत्रव्यवहार करून शिक्षकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षक परिषेदेने केली. लक्षवेधी आंदोलना प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगराचे कार्यवाह गुलाबराव पाटील, ठाणे शहर अध्यक्षा हेमलता मुनोत इतर पदाधिकारी ए. व्ही. पाटील आप्पाराव कदमसंध्या वाबळेसलीम सरअमित मिश्रा व विनोद मिश्रा उपस्थित होते.

शिक्षकांना लोकल प्रवासास परवानगी साठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे लक्षवेधी आंदोलन शिक्षकांना लोकल प्रवासास परवानगी साठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे लक्षवेधी आंदोलन Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads