Header AD

डोंबिवली शिवसेना शाखेतर्फे ५० अंध व्यक्तींना लसीकरण आणि रेशन किटची मदत




डोंबिवली ( शंकर जाधव) रोटरी क्लब ऑफ सन सिटी आणि शिवसेना यांच्या संयुक्त विधमाने लसीकरण अंधांची व लसीकरण सगळ्यांची या वाक्यद्वारे आज सकाळी ५० अंध व्यक्तींना लसीकरण करून रेशनिंग किट दिले.



               डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर शिवमंदिर येथील ज्ञानेश्वर हिंदी हायस्कुलच्या लसीकरण केंद्रात  वांगणी ,कर्जत, कल्याण,बदलापूर, व डोंबिवली येथील अंध व अपंग ५० ते ६० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले.रोटरी क्लब सनसिटी डोंबिवली आणि डोंबिवली शहर शाखे मार्फत अंधा - अपंगांना विशेष लसीकरण शिबिर ठेवण्यात आले होते. 



            राज्य शासनाच्या योजने  अंतर्गत समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तीला लस मिळायलाच हवी ह्याच उद्देशाने ही लसीकरण मोहीम घेण्यात आली.शिवसेना नेहमी समाजकार्य करते असते, त्याचाच एक भाग म्हणून अंध-अपंगांसाठी कोणतीही रांगा व गर्दी न करता त्यांच्यासाठी एका खोलीत विशेष व्यवस्था करून त्यांचे लसीकरण करून घेतल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.




         यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह  महापालिका वैधकीय अधिकारी डॉ. अदवरयु गौडकर , उपअभियंता रोहिणी लोकरे,रोटरीचे निशांत व्यास,लक्ष्मी शर्मा,  आदी उपस्थित होते.

डोंबिवली शिवसेना शाखेतर्फे ५० अंध व्यक्तींना लसीकरण आणि रेशन किटची मदत डोंबिवली शिवसेना शाखेतर्फे  ५० अंध व्यक्तींना लसीकरण आणि रेशन किटची मदत Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads