Header AD

केडीएमसीच्या वतीने सिटी पार्क मध्ये १४०० झाडांच्या लागवडीला सुरवात


■जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांनी किमान एका वृक्षाची लागवड करावी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने सिटी पार्कमध्ये १४०० झाडांच्या लागवडीला सुरवात करण्यात आली असून  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांनी किमान एका वृक्षाची लागवड करावीअसे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. आजच्या जागतिक पर्यावरण दिनीसिटी पार्क परिसरात स्व:हस्ते वृक्षारोपण करतांना त्यांनी हे आवाहन केले.


महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी तसेच नागरिकांनी आजच्या दिवशी शक्य असेल तिथे किमान एका वृक्षाची लागवड करावीमहापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आजपासून स्वत:पासूनच घरातला ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सुरुवात करावीजेणेकरून हा चांगला संदेश महापालिकेच्यावतीने सर्व नागरिकांना जाईलअसेही ते पुढे म्हणाले. नागरिकांनीदेखील आपला ओला व सुका कचरा वेगळा करावा म्हणजेच पर्यावरण दिनाचे सार्थक होईलअसे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.


सिटी पार्क परिसरात विविध प्रकारची सुमारे १४०० झाडे लावली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बारावे येथील एकात्मिक घनकचरा प्रकल्प येथेही वृक्षारोपण केले आणि सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरणही केले. वाडेघर येथील एस.टी.पी. प्लॅन्ट येथेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी घकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरेमुख्य उदयान अधिक्षक संजय जाधवकार्यकारी अभियंता तरुण जुनेजाउपअभियंता भालचंद्र नेमाडेप्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्तेसुधिर मोकलराजेश सावंतदिपक शिंदे व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

केडीएमसीच्या वतीने सिटी पार्क मध्ये १४०० झाडांच्या लागवडीला सुरवात केडीएमसीच्या वतीने सिटी पार्क मध्ये १४०० झाडांच्या लागवडीला सुरवात Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads