Header AD

द्वारली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरु नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार दिलासा

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्वेतील द्वारली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरु झाले असून स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हे लसीकरण केंद्र सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


कोरोना पासून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक असून हे लसीकरण प्रभागात सूरु व्हावं अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. आपल्या प्रभागातील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी लसीकरण केंद्रासाठी  शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार द्वारली येथील आरोग्य उपकेंद्र याठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून याठिकाणी ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणाला सुरवात झाली आहे.  नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वतः आज या द्वारली लसीकरण केंद्राला भेट देऊन पहाणी केली. तसेच शासनाच्या आदेशांचे पालन करून नव्या नियमावली नुसार कोणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


 नागरिकांचा वेळ खर्च होऊ नये आणि त्यांना त्रास होऊ नये याकरिता कुणाल पाटील यांनी स्वतः विशेष प्रयत्न करून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहेत. या लसीकरण केंद्रावर सेल्फी पॉईंट देखील बनविण्यात आला आहे. नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले असून द्वारली गावात लसीकरण केंद्र सुरू केल्या बद्दल नागरिकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत.


प्राथमिक आरोग्य केंद्र मांगरूळ अंतर्गत उपकेंद्र द्वारली येथे हे लसीकरण सुरु असून वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक चव्हाणसमुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. कर्माणी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शर्मिला पाटीलतुकाराम पानसरेनितीन चौधरीए. के. साबळेकविता रसाळसुलभा जाधवसुरक्षा म्हात्रेउज्वला जाधवनिर्मला पाटीलप्रमिला खंबायत आदी कर्मचारी लसीकरणासाठी कार्यरत आहेत. द्वारली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरु नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार दिलासा द्वारली आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरु नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार दिलासा Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads