Header AD

आधार वाडी कारा गृहातील कैद्यांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण

 

■कैद्यां सोबतच पोलीस व त्यांच्या कुटुंबियांनाही दिला कोवीशील्डचा डोस राज्यातील कारा गृहातील पहिलीच घटना...कल्याण , कुणाल  म्हात्रे   : कल्याण डोंबिवली मनपाच्या माध्यमातून कल्याणच्या आधारवाडी मध्यवर्ती कारागृहातील १९०७ कैद्यांना कोवीशील्ड कोरोना लसीकरणाचा पहिल्या डोसाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कर्तव्य बजावणारे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांचा देखील सहभाग घेऊन राज्यात लसीकरणाचा पहिला टप्पा  परिपूर्ण केला असूनराज्यातील कारागृहात लसीकरणात परिपूर्ण व अव्वल ठरले असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली आहे. आधारवाडी जेल मधील ४३ कैदी आणि ११ कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना काळात कैद्यांना आता थेट कारागृहामध्ये घेतले जात नसून येणाऱ्या कैद्यांना डॉन बॉस्को शाळेत विलगीकरण कक्षात ठेवले जात असून या विलगीकरण कक्षातील १४० कायद्यांना देखील कोवीशील्डची पहिली मात्रा देण्यात आली आहे. कारागृहात कोरोना संसर्गा संदर्भात दक्षता घेतली जात असल्याने कैदेत शिक्षा भोगत असणाऱ्या तसेच येथील बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या १४३ पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना पहिली लसीची मात्रा पूर्ण झाल्याची राज्यातील कारागृहातील ही पहिलीच घटना असल्याची माहिती अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली आहे.न्यायालयाकडून कस्टडी सुनावल्यानंतर या कैद्यांना कारागृहात शिक्षेसाठी पाठविले जात असते. मात्र कोरोणा संसर्गामुळे कारागृहातील कैद्यांकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने कारागृहातच कोवीशील्ड लसीकरणाची टप्प्याटप्प्याने मोहीम राबविण्यात आली होती. शिक्षा भोगत असणारे तसेच कच्चे कैदी असे एकूण १९०७ जणांवर लसीकरण करण्यात आले असून कारागृहातील १४३ बंदोबस्तासाठी तैनात असणारे पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबियांना देखील कोवीशील्ड लस टोचण्यात आल्याने राज्यात कैद्यांना व पोलीस कर्मचारी कुटुंबीयांना लसीचा पहिला डोस परिपूर्ण झाल्याचे कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.

आधार वाडी कारा गृहातील कैद्यांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण आधार वाडी कारा गृहातील कैद्यांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads