Header AD

विद्या पाटील यांच्या कुटुंबियांची शिवसेनेने घेतली भेट

 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील कुंभारखान पाडा येथील विद्या पाटील यांचा ३० मे रोजी कळवा येथे महिला रेल्वे डब्यात घुसून एका मोबाईल चोरट्याने मोबाईल चोरताना धक्का दिल्याने त्यांचा रेल्वे गाडी खाली पडून मृत्यू झाला. विद्या पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूची दखल घेऊन कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी मिळवून देण्याकरिता खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे  रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी करणार आहे. तसेच शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांसह संजय पावशे,किशोर मानकामे, सुधीर पाटील, राहुल म्हात्रे यांसह अनेक शिवसैनिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने त्वरित रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीच्या विद्या पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत आर्थिक मदत केली. तसेच ठाकुर्ली येथील शिवसैनिकांनी  स्टेशन प्रबंधकांची  भेटून रेल्वे स्टेशन वरील पोलिस सुरक्षा अति कडक करून महिलांच्या सुरक्षेची तेची काळजी घेणे बाबत निवेदन सादर केले.

विद्या पाटील यांच्या कुटुंबियांची शिवसेनेने घेतली भेट विद्या पाटील यांच्या कुटुंबियांची शिवसेनेने घेतली भेट Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads