Header AD

शिवसेना महिला आघाडी तर्फे वटपौर्णिमे निमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण




डोंबिवली ( शंकर जाधव ) एमआयडीसी शिवसेना महिला आघाडीतर्फे वटपौर्णिमेनिमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. वडाचे झाडाचे बहुउपयोगी तसेच आयुर्वेदातील महत्त्व आणि सद्याचा करोना महामारीचा दिवसात ऑक्सीजनची गरज ओळखून सर्वात जास्त ऑक्सीजन देणारे झाड याचे महत्त्व ओळखून डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील शिवसेनेचा महिला आघाडीतर्फे पाच वडाचा वृक्षांचे वृक्षारोपण वटपौर्णिमेनिमित्त  केले.



            या वडाचा वृक्षांचे पुढे वर्षभर संगोपन व रक्षण करण्याची जबाबदारी या महिलांनी घेतली आहे. निवासी भागात लावलेल्या पाच झाडापैकी एक वडाचे झाड सुदामा नगर मधील श्रीराम आर्केड सोसायटी जवळ लावण्यात आल्यानंतर त्याची रीतसर पूजा करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना एमआयडीसी महिला शाखाप्रमुख, संघटक अनुजा सावंत तसेच  सुप्रिया तावडे, मुग्धा मुकादम, वनिता सावंत, सुनंदा स्वर्गे इत्यादी महिला उपस्थित होत्या.
शिवसेना महिला आघाडी तर्फे वटपौर्णिमे निमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण शिवसेना महिला आघाडी तर्फे वटपौर्णिमे निमित्त वडाचा झाडाचे वृक्षारोपण   Reviewed by News1 Marathi on June 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads